Goa Professional Football League 2023-24 
क्रीडा

Goa Professional League: पॅक्स ऑफ नागोवाची दणदणीत कामगिरी, वास्को क्लबला 3-0 फरकाने नमविले

सामन्याच्या तिसऱ्या मिनिटास जेस्लॉय मोनिझ यान नागोवा संघाला आघाडी मिळवून दिली.

किशोर पेटकर

Goa Professional Football League 2023-24: पॅक्स ऑफ नागोवा संघाने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी दणदणीत कामगिरी बजावली. स्पर्धेतील या नवोदित संघाने दुसऱ्या फेरीत माजी विजेत्या वास्को स्पोर्टस क्लबला 3-0 फरकाने सहज नमविले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

सामन्याच्या तिसऱ्या मिनिटास जेस्लॉय मोनिझ यान नागोवा संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर क्लायमॅक्स फर्नांडिसने संघाच्या आघाडीत वाढ करताना शानदार गोल केला. झंझावाती फ्रीकिक फटक्यावर निक्सन कास्ताना याने नागोवा संघाच्या खात्यात तिसऱ्या गोलची भर टाकली. नंतर एडवर्ड सौझा याच्या फटक्याचा नेम चुकल्यामुळे पॅक्स ऑफ नागोवाची आघाडी तीन गोलपुरती मर्यादित राहिली.

पॅक्स ऑफ नागोवाला पहिल्या फेरीत स्पोर्टिंग क्लब द गोवाकडून दोन गोलने हार पत्करावी लागली होती. गुरुवारच्या विजयामुळे नागोवा येथील संघाचे आता दोन लढतीनंतर तीन गुण झाले आहेत. वास्को क्लबवर सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की आली. अगोदरच्या लढतीत त्यांना गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबने हरविले होते.

तिसरी फेरी उद्यापासून

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेची तिसरी फेरी शनिवारपासून (ता.09) खेळली जाईल. धुळेर स्टेडियमवर या फेरीतील पहिला सामना धेंपो स्पोर्टस क्लब व यंग बॉईज ऑफ टोंक या संघांत खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhargal: सफर गोव्याची! 1550 साली आक्रमकांपासून वाचवण्यासाठी प्राचीन मंदिर इथे हलवले, हिरव्या शालीत गुंडाळलेलं 'धारगळ'

Mangal Gochar 2026: धरतीपुत्र मंगळाची वक्रदृष्टी! 'या' 3 राशींना बसणार मोठा फटका; आर्थिक चणचण अन् मानसिक ताण वाढणार

IND vs PAK: "पाकिस्तान टीम मी माझीच मानतो, पराभवामुळे मला...", पाकड्यांच्या पराभवाचं भारताच्या माजी न्यायमूर्तींना दु:ख

8th Pay Commission: सावधान! पगार वाढीच्या आमिषाला बळी पडू नका, WhatsApp वर फिरतोय 8व्या वेतन आयोगाचा 'फेक' मेसेज; गृह मंत्रालयाचा अलर्ट

गुन्हेगारांना कायद्याचा धाक! नव्या न्याय संहितांच्या अंमलबजावणीत गोवा देशात अग्रस्थानी; DGP आलोक कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT