Goa Professional Footbal League Dainik Gomantak
क्रीडा

Goa Professional Footbal League: सेझा, चर्चिल ब्रदर्सचे दणदणीत विजय

मापुईया याचे चार गोल; पणजी फुटबॉलर्स, गार्डियन एंजल पराभूत

किशोर पेटकर

Goa Professional Footbal League: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सेझा फुटबॉल अकादमी व चर्चिल ब्रदर्सने गुरुवारी विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. त्यांनी अनुक्रमे पणजी फुटबॉलर्स व गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबला हरविले.

मापुईया (लाल्खॉपुईमाविया) याने नागोवा येथील मैदानावर चार गोल केले. त्यामुळे चर्चिल ब्रदर्सने गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबचा ६-१ फरकाने धुव्वा उडविला. मापुईया याने अनुक्रमे ६४, ६५, ७०, ९०+३ व्या मिनिटास गोल केला. तोच सामनावीर ठरला.

याशिवाय ज्योबर्न कार्दोझ याने ४४व्या, तर जॉर्ज डिसोझा याने ८६व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. गार्डियन एंजलचा एकमात्र गोले ४५+१व्या मिनिटास जॉयविन कॉस्ता याने नोंदविला.

मोठ्या विजयासह आता चर्चिल ब्रदर्स संघ अग्रस्थानी आला आहे. त्यांचे व धेंपो क्लबचे समान १२ गुण झाले आहेत, मात्र चर्चिल ब्रदर्सची गोलसरासरी +१० अशी सरस असून +७ गोलसरासरीसह धेंपो क्लब दुसऱ्या स्थानी आहे.

गार्डियन एंजल संघाला सलग सातवा पराभव पत्करावा लागला. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक ३१ गोल स्वीकारण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे.

कुणाल, क्लेन्सियोचे गोल

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सामनावीर कुणाल साळगावकर (२०वे मिनिट) व बदली खेळाडू क्लेन्सियो पिंटो (८८वे मिनिट) यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर सेझा फुटबॉल अकादमीने पणजी फुटबॉलर्सला २-० असे हरविले. सेझा अकादमीचे आता पाच लढतीनंतर आठ गुण झाले असून पणजी फुटबॉलर्सचे सहा सामन्यानंतर आठ गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT