Goa Police Cup Football : धेंपो स्पोर्टस क्लबच्या डॅरेल मस्कारेन्हास याला सामना पुरस्कार देताना मान्यवर. Dainik Gomantak
क्रीडा

Goa Police Cup Football स्पर्धेत धेंपो, एफसी गोवा उपांत्य फेरीत !

धेंपो, एफसी गोवा उपांत्य फेरीत

दैनिक गोमन्तक

पणजी: धेंपो स्पोर्टस क्लब , एफसी गोवा (FC Goa) संघाने शनिवारी 17 व्या गोवा पोलिस कप (Goa Police Cup Football) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नावेली येथील रोझरी मैदानावर धेंपो क्लबने वास्को स्पोर्टस क्लबला 3-1 फरकाने हरविले. पर्रा येथील मैदानावर एफसी गोवा संघाने सेझा फुटबॉल अकादमीसही 3-1 फरकाने नमविले.

वास्को क्लबविरुद्ध धेंपो क्लब विश्रांतीला दोन गोलने आघाडीवर होता. आल्बर गोन्साल्विसने 33 व्या मिनिटास धेंपो क्लबला आघाडी मिळवून दिली, नंतर पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत लतेश मांद्रेकर याने संघाच्या खाती दुसऱ्या गोलची भर टाकली. 79 व्या मिनिटास कुलदीप कुमार याने वास्को क्लबची पिछाडी एका गोलने कमी केली. 81 व्या गौरव वायगणकर याने धेंपो क्लबच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना वास्को क्लबच्या कुलदीप कुमार याला सामन्यातील दुसरे यलो कार्ड मिळाले, त्यामुळे या संघाचा एक खेळाडू कमी झाला. विजयी धेंपो संघाचा कर्णधार डॅरेल मस्कारेन्हास सामन्याचा मानकरी ठरला.

सेझा अकादमीविरुद्ध पूर्वार्धातील खेळात एफसी गोवा संघ 3-1 फरकाने आघाडीवर होता. रिझबन फर्नांडिसने सातव्या मिनिटास सेझा अकादमीस आघाडी मिळवून दिली. 23 व्या मिनिटास वासीम इनामदार याने बरोबरीचा गोल नोंदविल्यानंतर 43 व्या मिनिटास ब्रिसन फर्नांडिसने एफसी गोवास 2-1 असे वर्चस्व मिळवून दिले. 45+1 व्या मिनिटास लालरेमरुआता याने एफसी गोवाची आघाडी आणखीनच बळकट केली. एफसी गोवाचा आयव्हन कॉस्ता सामन्याचा मानकरी ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT