कांदोळकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडीत हॅटट्रिक साधली,असून अन्य आठ जागांवरही त्यांच्या गटातील उमेदवार विजयी ठरले. Dainik Gomantak
क्रीडा

Goa: तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेवर कांदोळकर गटाचे वर्चस्व

अध्यक्षपदी हॅटट्रिक; सर्व नऊ जागांवर `टूगेदर फॉर चेस`चे उमेदवार विजयी, मळा-पणजी : तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेची नवी व्यवस्थापकीय समिती स्थापन झाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: महेश कांदोळकर (Mahesh Kandolkar) यांच्या `टूगेदर फॉर चेस`(Together for Chess) या गटाने तिसवाडी (Tiswadi) तालुका बुद्धिबळ (Chess) संघटनेच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व राखले. स्वतः कांदोळकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडीत हॅटट्रिक साधली, तर अन्य आठ जागांवरही त्यांच्या गटातील उमेदवार विजयी ठरले.

कांदोळकर यांना 70 मते मिळाली. `टूगेदर फॉर चेस` गटातील उमेदवारांत कुमारसेन कांबळी (59 मते) उपाध्यक्षपदी, दत्ताराम पिंगे (69 मते) सचिवपदी, अरविंद म्हामल (68 मते) खजिनदारपदी, ज्ञानेश्वर नाईक (66 मते) संयुक्त सचिवपदी निवडून आले. चार सदस्यपदासाठी नरेश पेडणेकर (68 मते), प्रकाश सावंत (63 मते), रत्नाकर फातर्पेकर (63 मते), शिवा (आतिश) आंगले (71 मते)यांची सरशी झाली.

विरोधी `पॅशनेट फॉर चेस` गटातील सर्व उमेदवार पराभूत झाले. त्यात अध्यक्षपदासाठी संदेश प्रभू चोडणेकर (42), उपाध्यक्षपदासाठी शंभू शिरोडकर (49 मते), सचिवपदासाठी संजय बेलुरकर (41 मते), खजिनदारपदासाठी बाळकृष्णन पोडुवाल (42 मते), संयुक्त सचिवपदासाठी अभय भामईकर (44 मते) आणि चार सदस्यपदासाठी पीटर रिबेलो (44 मते), अर्शा चोपडेकर (46 मते), विशालक्षी शेट्टी (45 मते), राजू नाईक (36 मते) निवडणूक रिंगणात होते.

तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेची निवडणूक रविवारी मळा-पणजी येथील महालक्ष्मी वाचन मंदिर सभागृहात झाली. तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीत 119 पैकी 113 प्रतिनिधींनी मतदान केले. नीळकंठ सिग्नापूरकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले, त्यांना श्री. तारी यांचे सहाय्य लाभले. विश्वास पिळर्णकर गोवा बुद्धिबळ संघटनेचे निरीक्षक होते. तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेची नवी व्यवस्थापकीय समिती 2021-2025 या कालावधीसाठी कार्यरत असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

Sexual Assault Case: तरुण तेजपालला मोठा झटका! लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टानं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT