Neeraj Chopra Torch rally bearer In 37th National Games 2023 Dainik Gomantak
क्रीडा

37th National Games Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या टॉर्च रॅलीसाठी नीरज चोप्राची उपस्थिती

स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे

Rajat Sawant

Neeraj Chopra Torch Rally Bearer In 37th National Games 2023: वर्ल्ड चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा गोव्यात होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या टॉर्च रॅलीसाठी उपस्थित राहणार आहे. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शनिवारी नावेली येथे यासंबंधी माहिती दिली.

नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियमला मंत्री गावडे यांनी भेट देऊन तयारीची पाहणी केली. 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

मंत्री गावडे म्हणाले, 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटनावेळी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून क्रिडा वातावरणात संपन्न होईल. गोव्यातील गायकांसोबत देशातील गायक उपस्थित राहून उत्साह वाढवणार आहेत.

तसेच या सोहळ्यात मशाल वाहक म्हणून ऑलिंपिक व आशियाई भालाफेक विजेता अ‍ॅथलिट निरज चोप्रा उपस्थित राहणार आहे. त्याने याबाबतचे आमंत्रण स्विकारले असून निरज चोप्रा मशाल वाहक म्हणून येणे ही गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT