Purvaja Verlekar (Goa Women's Cricket) Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या विजयात पूर्वजाचे अर्धशतक

शिखाची अष्टपैलू चमक; गुजरातला सात विकेटने नमविले

Dainik Gomantak

Goa: सलामीची पूर्वजा वेर्लेकर (Purvaja Verlekar) हिचे नाबाद अर्धशतक, तसेच कर्णधार शिखा पांडेच्या (Captain Shikha Pandey) अष्टपैलू खेळीच्या बळावर गोव्याने गुरुवारी सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट (Women's Cricket) स्पर्धेत तिसऱ्या विजयाची नोंद केली. एलिट ड गट सामन्यात त्यांनी गुजरातला सात विकेट राखून हरविले.

सामना विझियानगरम येथील डॉ. पीव्हीजी राजू एसीए क्रीडा संकुल मैदानावर झाला. गोव्यासमोर विजयासाठी 136 धावांचे लक्ष्य होते. 37.2 षटकांत 3 विकेट गमावून गोव्याने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. पावसामुळे सामना प्रत्येकी 47 षटकांचा करण्यात आला होता.

पूर्वजा हिने 99 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने नाबाद 56 धावा केल्या. तिने शिखा समवेत चौथ्या विकेटसाठी 48 धावांची अभेद्य भागीदारी केली. शिखाने 29 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 22 धावा केल्या. त्यापूर्वी पूर्वजाने तेजस्विनी दुर्गद हिच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी करून गोव्याच्या विजयाचा पाया रचला होता. शिखा पांडे, पूर्वा भाईडकर व रूपाली चव्हाण यांनी प्रत्येकी दोन विकेट टिपत गुजरातचा डाव 7 बाद 135 धावांत रोखण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

मध्य प्रदेश अव्वल, गोवा द्वितीय

एलिट ड गटात सर्व चारही सामने जिंकून मध्य प्रदेश संघ 16 गुणांसह अव्वल आहे. गोवा गटात दुसऱ्या स्थानी आहे. तीन विजय व एका पराभवासह त्यांचे 12 गुण झाले आहेत. गोव्याचा शेवटचा सामना शनिवारी 6 नोव्हेंबरला चारही सामने गमावलेल्या मिझोरामविरुद्ध होईल. गटात विदर्भचे 10, गुजरातचे 6, तर हरियानाचे 4 गुण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT