Berlin Special Olympic | Geetanjali Nagvekar  Dainik Gomantak
क्रीडा

Berlin Special Olympic: गोव्याच्या कन्यांनी गाजवले बर्लिन; स्पेशल ऑलिंपिकध्ये जिंकले एक सुवर्ण, एक ब्राँझपदक

7,000 हून अधिक खेळाडुंचा सहभाग

Akshay Nirmale

Goan Girls in Berlin Special Olympic: बर्लिन येथे सुरू असलेल्या स्पेशल ऑलिंपिकमध्ये गोव्याच्या दोन मुलींनी पदकांची लयलूट केली आहे. गीतांजली नागवेकर हीने लेव्हल डी 800 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे तर तानिया उल्हास उसगावकर हीने रोलर स्केटिंग प्रकारात ब्राँझपदक जिंकले आहे.

बर्लिनमध्ये ही जागतिक स्पर्धा सुरू असून विशेष क्रीडापटूंसाठी दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होते. या स्पर्धेत 7,000 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. विविध 26 क्रीडा प्रकारात ही स्पर्धा होत आहे.

दरम्यान, गीतांजली ही मूळची गोव्यातील नेरूळ येथील आहे. तिने कुद्रियावत्सेवा काटेरिना (युक्रेन) आणि वॅट्स जोलिन (कॅनडा) यांना मागे टाकत सुवर्णपदक जिंकले.

गीतांजलीची आई रश्मी यांनी सांगितले की, गीतांजलीला व्हिक्टर वाझ या तिच्या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. गीतांजली या स्पर्धेत 400 मीटर, 800 मीटर आणि 4x400 मीटर रिलेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

तर तानिया उल्हास उसगावकर हीने 30 मीटर रोलर स्केटिंग प्रकारात ब्राँझ पदक जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: युतीच्या चर्चेला मुहूर्त, विजय-गिरीश यांची मडगावात भेट; जागावाटपावर मात्र 'ब्र'ही नाही

Peru Tourist Plane Crash: पेरूमध्ये भीषण दुर्घटना! पर्यटकांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; पायलटसह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू VIDEO

Horoscope: संकष्टी चतुर्थीला गणरायाची विशेष कृपा! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, समृद्धी, नोकरीची संधी आणि धनवर्षाव

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

SCROLL FOR NEXT