गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल रविवारी पणजी फुटबॉलर्स व सेझा फुटबॉल अकादमी यांच्यात झालेल्या सामन्याचा क्षण. Dainik Gomantak
क्रीडा

पणजी फुटबॉलर्स विरुद्ध सेझा अकादमी सामना बरोबरीत

पणजी फुटबॉलर्सची स्पर्धेत पहिल्या गुणाची कमाई

Dainik Gomantak

Goa Football: पणजी फुटबॉलर्सने यंदाच्या गोवा प्रोफेशनल लीग (Goa Professional League) फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या गुणाची कमाई करताना रविवारी सेझा फुटबॉल अकादमीस गोलशून्य बरोबरीत रोखले. सामना म्हापसा येथील धुळेर (Duler-Mapusa Stadium) स्टेडियमवर झाला.

पणजी फुटबॉलर्सला अगोदरच्या लढतीत स्पोर्टिंग क्लबविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. रविवारी त्यांनी बचाव अभेद्य राखला. सेझा अकादमीची ही सलग दुसरी बरोबरी ठरली. यापूर्वीच्या लढतीत त्यांनी साळगावकर एफसीला गोलबरोबरीत रोखले होते. त्यांचे आता दोन लढतीनंतर दोन गुण झाले आहेत.

सामन्याच्या प्रारंभी सेझा अकादमीस आघाडी घेण्याची संधी होती, पण ओमकार आरोंदेकर याचा फटका अडविता पणजी फुटबॉलर्सचा गोलरक्षक प्रेस्टन रेगो याने वेगाने हालचाल केली. त्यानंतर दोन्ही संघाने आक्रमणे केली, पण त्यांना यश लाभले नाही. त्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. सामन्याच्या भरपाई वेळेत सेझा अकादमीस गोल करण्याची चांगली संधी होती. मात्र कुणालचा फटका पणजी फुटबॉलर्सचा बचावपटू धीरज चौहान याने यशस्वी होऊ दिला नाही.

वेळसाव-धेंपो लढत आज

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लब व धेंपो स्पोर्टस क्लब यांच्यात सामना होईल. धेंपो क्लबच्या खाती सध्या एक गुण आहे, तर वेळसाव क्लबला पहिली लढत गमवावी लागली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT