Prajwal A. Pawar Dainik Gomantak
क्रीडा

स्क्वेय आर्टिस्टिक राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याने पटकावला दुसरा क्रमांक

स्क्वेय फेडरेशन ऑफ इंडियाच्या (Squay Federation of India) सहकार्याने आयोजित केलेल्या दुसऱ्या ऑनलाईन स्क्वेय आर्टिस्टिक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत गोव्याला (Goa) दुसरे स्थान प्राप्त झाले.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: स्क्वेय असोसिएशन ऑफ कर्नाटकने (Squay Association of Karnataka) स्क्वेय फेडरेशन ऑफ इंडियाच्या (Squay Federation of India) सहकार्याने आयोजित केलेल्या दुसऱ्या ऑनलाईन स्क्वेय आर्टिस्टिक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत गोव्याला (Goa) दुसरे स्थान प्राप्त झाले. गोव्याला 4 सुवर्ण, 2 रौप्य, 9 कांस्य पदकांसह एकुण 15 पदके मिळाली. गोव्याचे 35 गुण झाले. प्रथम स्थान अंदमान निकोबारला (Andaman Nicobar) प्राप्त झाले. त्यांना 5 सुवर्ण, 4 रौप्य व 5 कांस्य पदकांसह एकुण 14 पदके मिळाली. पण त्यांना एक सुवर्ण पदक जास्त मिळल्या मुळे त्यांचे 42 गुण झाले.

ही स्पर्धा 11, 14 व 18 वर्षाखालील अशा तीन वयोगटांमध्ये झाली. या स्पर्धेत एकुण 19 राज्यातील खेळाडुंनी भाग घेतला व जम्मू काश्मिर 27, महाराष्ट्र 26 व कर्नाटक 25 पदकें यांना पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळाले. 

गोव्यासाठी प्रज्वल ए पवार (Prajwal A. Pawar) (11 वर्षाखालील), स्वेता आर पंडित, सक्षम एस कुंकळयेकर, समिक्षा सी भट (14 वर्षाखालील) यांना सुवर्ण पदके प्राप्त झाली. यश आर. नाईक (11 वर्षाखालील) श्रेश सोलियेकर देसाई (18 वर्षाखालील) यांना रौप्य पदक जिंकता आले. सांची जी प्रभु नास्नोडकर, सानवी एस नाईक, दक्ष डी नाईक, कशीश जी नाईक (11 वर्षाखालील), आर्यन ए नाईक, सिमरन ए पवार (14 वर्षाखालील), दिप्तेश डी नाईक, आलबर्ट एफ फेर्रांव, लकेशा झोयसा फर्नांडिस( 18 वर्षाखालील) यांनी कांस्य पदके जिंकली. या स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, ओडिशा, दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT