Goa cricket association Dainik Gomantak
क्रीडा

Goa Cricket: ज्युनियर संघाचा पुण्यात सराव

Goa Cricket : दोन्ही संघ एक सप्टेंबरला रवाना होतील

दैनिक गोमंतक

पणजीः गोव्याच्या 19 वर्षांखालील पुरुष व महिला क्रिकेट संघाचे मोसमपूर्व सराव शिबिर पुण्यात (Pune) घेण्याचे गोवा क्रिकेट असोसिएशनने (Goa Cricket Association) निश्चित केले आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे 2020-21 मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकही ज्युनियर स्पर्धा झाली नाही. यंदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (Board of Control for Cricket in India) कोविड-19 पार्श्वभूमीवर ज्युनियर स्पर्धा घेण्याचे निश्चित केले आहे. जीसीए सचिव विपुल फडके यांनी सांगितले, की ‘‘सध्या आम्ही 19 वर्षांखालील दोन्ही संघाचे सराव शिबिर पुण्यात घेण्याचे निश्चित केले आहे. संघ एक सप्टेंबरला रवाना होतील. बाकी सविस्तर वेळापत्रक आणि संभाव्य संघाची माहिती नंतर दिली जाईल. प्राथमिक वेळापत्रक तयार आहे, पण त्यात काही बदल होऊ शकतात, पण दोन्ही संघ दौऱ्यावर जाणार हे निश्चित.’’

19 वर्षांखालील पुरुष विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा, तसेच 19 वर्षांखालील महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा येत्या 20 सप्टेंबरपासून नियोजित आहे. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक, तसेच गटवारी अजून बीसीसीआयने जाहीर केलेली नाही. गोव्याचे दोन्ही संभाव्य संघ सध्या पर्वरी येथे इनडोअर नेटमध्ये सराव करत आहे. 19 वर्षांखालील पुरुष संघाला राजेश कामत यांचे, तर महिला संघाला अनंत तांबवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गोव्याचा सीनियर पुरुष क्रिकेट संभाव्य संघ सध्या सरावासाठी पुदुचेरीत आहे. मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सरावावर भर असून सप्टेंबरमध्ये पुदुचेरी येथे काही सामने खेळण्याचे नियोजन आहे. यंदाच्या मोसमात सीनियर संघ 27 ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20, 1 डिसेंबरपासून विजय हजारे करंडक एकदिवसीय, तर 5 जानेवारीपासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळणे नियोजित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra ATF VAT Reduction: विमान प्रवाशांसाठी गुड न्यूज! फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय; विमान इंधनावरील 'व्हॅट' थेट 18 टक्क्यांवरुन 7 टक्क्यावर

PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

Ketu Gochar 2026: केतुने बदलली चाल अन् 3 राशींच्या नशीबाने घेतला 'यू-टर्न'! ऑफिसमधील कामाचे क्रेडिट चमच्यांना मिळणार; करिअरची गाडीही पंक्चर होणार

SCROLL FOR NEXT