पर्वरी ः पत्रकार परिषदेत माहिती देताना जीसीए सचिव रोहन गावस देसाई. सोबत संयुक्त सचिव रुपेश नाईक, महिला क्रिकेटपटू सदस्य डेझी, महिला क्रिकेट संचालक सर्वेश नाईक. Dainik Gomantak
क्रीडा

GCA General Meeting: डॉ. भाटीकर यांना दिलासा; बडतर्फीऐवजी कारणे दाखवा नोटीस; महिला प्रीमियर लीग 1 एप्रिलपासून

आमसभेच्या शिफारसीस स्थगिती

किशोर पेटकर

GCA General Meeting: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) आमसभेने डॉ. केतन भाटीकर यांचे आजीव सदस्यत्व बडतर्फ करण्याची शिफारस संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीला केली होती.

कार्यकारिणीने मंगळवारी झालेल्या बैठकीत या त्यास स्थगिती देताना संबंधितास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय एकमताने घेतल्याची माहिती जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जीसीए आमसभा 12 मार्च रोजी झाली होती. त्यावेळी संघटनेच्या विरोधात वावरणारे, संघटनेला बदनाम करणारे डॉ. केतन भाटीकर यांना संघटनेत का ठेवतात अशी विचारणा क्लबांनी केली होती. संघटनेच्या आजीव सदस्यपदावरून भाटीकर यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव आमसभेत बहुमताने मांडण्यात आला होता.

त्यांच्या बडतर्फीचा कालावधी किती असेल हे व्यवस्थापकीय समितीने ठरवावे असेही त्या बैठकीत ठरले होते. जीसीए वैद्यकीय संचालकपदावरुनही भाटीकर यांना हटवण्याचा निर्णयही आमसभेत झाला होता.

2018 मधील जीसीएल स्पर्धेतील बक्षीस रक्कम भाटीकर यांच्याकडून वसूल करून घ्यावी अशी सूचना आमसभेत क्लबनी जीसीए व्यवस्थापकीय समितीला केली होती.

या संदर्भात रोहन यांनी मंगळवारच्या बैठकीनंतर सांगितले, की ``आजच्या व्यवस्थापकीय समिती बैठकीत भाटीकर यांना वैद्यकीय संचालकपदावरून हटविण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला.

आजीव सदस्यत्व बडतर्फ करण्यापूर्वी त्यांना संबंधित बक्षीस रक्कमप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे ठरले. भाटीकर यांच्या उत्तरानंतर संबंधित प्रस्ताव पुन्हा आमसभेत क्लबांसमोर मांडण्यात येईल व अंतिम निर्णय घेतला जाईल.`` जीसीए कार्यकारिणीच्या निर्णयाने आजीव सदस्यत्वप्रकणी भाटीकर यांना सध्या दिलासा मिळाला आहे.

जीसीए कार्यकारिणी बैठकीतील इतर निर्णय

  • संघटनेचा मडगाव क्रिकेट क्लबशी (एमसीसी) सामंजस्य करार, त्यानुसार पूर्ण क्रिकेट अकादमी व सराव नेट सुविधा

  • एप्रिलमध्ये सीनियर पुरुष, 19 वर्षांखालील मुलगे, महिला क्रिकेटपटूंसाठी शिबिरसत्र

  • तिन्ही गटातील क्रिकेटपटूच्या शिबिरासाठी व्यावसायिक प्रशिक्षकाची नियुक्ती

  • राज्यातील पुरुष व महिला क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी उपाययोजना

गोवा महिला प्रीमियर लीग 1 एप्रिलपासून

  • जीसीए मान्यतेने खासगी संस्थेद्वारे राज्यातील महिला क्रिकेटपटूंसाठी 1 ते 9 एप्रिल या कालावधीत गोवा महिला प्रीमियर लीग टी-20 स्पर्धा

  • एकूण 5 संघांचा समावेश, दिन-रात्र पद्धतीने सामने

  • साखळी फेरी पद्धतीने 12 सामने, अव्वल 2 संघ अंतिम फेरीत

  • लिलावात राज्यातील एकूण 147 महिला क्रिकेटपटू, प्रत्येक संघात 3 आऊटस्टेशन खेळाडू

  • विजेत्या संघाला 2 लाख रुपये, उपविजेत्या संघाला 1 लाख रुपये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT