Cricket Dainik Gomantak
क्रीडा

Ranji Trophy: गोव्याचे रणजी शिबिर सोमवारपासून होणार सुरु

किशोर पेटकर

पणजी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) फेब्रुवारीत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा खेळविण्याचे निश्चित केल्यानंतर, गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) संघाचे शिबिर सोमवारपासून पुन्हा सुरु करण्याचे ठरविले आहे. (Goa Cricket Associations Ranji Camp Will Resume On Monday)

दरम्यान, कोविड-19 (Covid-19) संबंधित सर्व शिष्टाचार पाळून संभाव्य संघाचे शिबिर घेतले जाईल. संघाचे मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई (K. Bhaskar Pillai) काही दिवसांनी दाखल होतील. त्यापूर्वी पर्वरी येथे संघ सराव करेल, असे जीसीए सचिव विपुल फडके यांनी शनिवारी सांगितले. अगोदर शिबिरात तिन्ही पाहुण्या क्रिकेटपटूंसह 23 संभाव्य खेळाडू होते, त्यांनाच पुन्हा बोलावण्यात आले आहे, अशी माहिती फडके यांनी दिली.

रणजी क्रिकेट स्पर्धेतील गोव्याची मोहीम 13 जानेवारीपासून सुरू होणार होती. कोविड रुग्णांची संख्या देशभरात वाढू लागल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) रणजी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गोव्याचे शिबिरही थांबविण्यात आले होते. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांनी स्पर्धा घेण्याचे सूतोवाच केले असून मंडळाच्या सोमवारच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. बीसीसीआयनुसार, स्पर्धेची साखळी फेरी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळली जाईल, नंतर जून-जुलैमध्ये बाद फेरीतील सामने होतील. आयपीएल स्पर्धा 27 मार्चपासून भारतातच खेळली जाईल.

एलिट ड गटात समावेश

अगोदरच्या नियोजनानुसार गोव्याचा एलिट ड गटात समावेश होता व सामने अहमदाबाद येथे खेळले जाणार होते. या गटात गोव्यासह सौराष्ट्र, झारखंड, तमिळनाडू, जम्मू-काश्मीर व रेल्वे हे संघ आहेत. 2021-22 मोसमात गोव्याचा सीनियर संघ सय्यद मुश्ताक अली करंडक (Syed Mushtaq Ali Trophy) टी-20 आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत खेळला होता. कोविडमुळे 2020-21 मोसमातही रणजी स्पर्धा झाली नव्हती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT