Chess Tournament Dainik Gomantak
क्रीडा

Chess Tournament : शांतादुर्गा, विद्याविहार हायस्कूल बुद्धिबळात विजेते

राज्यस्तरीय स्पर्धा ; १४ वर्षांखालील गटात अनुक्रमे मुला, मुलींत बाजी

गोमन्तक डिजिटल टीम

Chess Tournament : क्रीडा व युवा व्यवहार संचालनलयातर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील मिनी-सेकंडरी शालेय बुद्धिबळ स्पर्धेत राज्यस्तरीय पातळीवर मुलांत डिचोलीच्या श्री शांतादुर्गा हायस्कूलने, तर मुलींत ठाणे-कुठ्ठाळी येथील विद्याविहार हायस्कूलने विजेतेपद पटकावले. स्पर्धा बुधवारी मिरामार येथील यूथ हॉस्टेलमध्ये झाली.

मुलांच्या अंतिम लढतीत श्री शांतादुर्गा हायस्कूलने मडगावच्या मनोविकास इंग्लिश स्कूलवर ४-० डावफरकाने विजय मिळविला. तिसरा क्रमांक मिरामारच्या शारदा मंदिर स्कूलला मिळाला. त्यांनी फोंड्याच्या ए. जे. द आल्मेदा हायस्कूलला ३-१ डावफरकाने नमविले.

मुलींची अंतिम लढत चुरशीची ठरली. विद्याविहार हायस्कूलने मिरामारच्या शारदा मंदिर स्कूलला ४-३ असे निसटत्या डावफरकाने पराजित केले. आल्मेदा हायस्कूलला तिसरा क्रमांक मिळाला. त्यांनी डिचोलीच्या श्री शांतादुर्गा हायस्कूलला ४-२ फरकाने हरविले.

क्रीडा खात्याचे राज्यस्तरीय क्रीडा आयोजक अनंत सावळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाली. दत्ताराम पिंगे स्पर्धेचे आर्बिटर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT