Goa chess Association Dainik Gomantak
क्रीडा

Goa Chess: राज्य बुद्धिबळ संघटनेची निवडणूक 22 ऑगस्टला

Goa Chess: नवी समिती 2021-2025 कालावधीसाठी कार्यरत असेल

दैनिक गोमंतक

पणजीः गोवा बुद्धिबळ संघटनेच्या (Goa Chess Association) नव्या कार्यकारी समितीसाठी (Executive Committee) येत्या 22 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. नवी समिती 2021-2025 कालावधीसाठी कार्यरत असेल. संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी सांगितले, की निवडणूक उमेदवारी अर्ज वितरण प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली. 28 जुलै रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज उपलब्ध असतील. वास्को (Vasco) येथील संघटनेच्या नोंदणीकृत कार्यालयात पूर्ण भरलेले उमेदवारी अर्ज 29 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या कालावधीत स्वीकारले जातील. 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4.30 ते 5 या कालावधीत उमेदवारी अर्जांची छाननी होईल. वैध उमेदवारांची यादी 5 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता जाहीर होईल. उमेदवारी अर्ज 5 ते 10 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मागे घेता येतील. 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.30 वाजता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. निवडणूक रविवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत होईल, त्याचदिवशी मतमोजणी आणि निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता संघटनेची आमसभा होईल, त्यावेळी निवडणूक निकालाची घोषणा होईल.

गोवा बुद्धिबळ संघटनेच्या मावळत्या कार्यकारी समितीचा कालावधी गेल्या ३० जून रोजी संपला, पण राज्यातील कोविड-19 निर्बंधांमुळे निवडणूक पुढे ढकलावी लागली होती. राज्य संघटनेशी संलग्न तालुका बुद्धिबळ संघटनेच्या 2021-2025 कालावधीतील कार्यकारी समितीचे सदस्य निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करू शकतात. 12 संलग्न तालुका बुद्धिबळ संघटनेच्या कार्यकारी समितीतील दोघे सदस्य मतदानात भाग घेऊ शकतील. बायणा-वास्को येथील माता सेकंडरी स्कूल नंबर 1चे मुख्याध्यापक सुभाष बी. शिरोडकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी, तर मडगाव येथील के. व्ही. महंत यांची उप निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT