गोव्याची इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Goa: बुद्धिबळपटू भक्तीची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

भारताने गतवर्षी ऑलिंपियाड बुद्धिबळ स्पर्धेत रशियासह संयुक्त विजेतेपद मिळविले. त्यावेळी भक्तीची प्रथमच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड झाली होती. भक्तीने साखळी फेरीत सर्व तिन्ही सामने जिंकले.

दैनिक गोमन्तक

पणजी: अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (All India Chess Federation) आगामी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी (National Sports Awards) गोव्याची (Goa) इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू (Chess player) भक्ती कुलकर्णी (Bhakti Kulkarni) हिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. त्यास गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी दुजोरा दिला.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने ग्रँडमास्टर कोनेरू हंपी हिची खेलरत्न पुरस्कारासाठी, तर विदित गुजराथी, एम. आर. ललित बाबू, अधिबन भास्करन, एस. पी. सेतूरमण, पद्मिनी रोऊत व भक्ती कुलकर्णी यांची अर्जुन पुरस्कारासाठी, तर अभिजित कुंटे यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

गतवर्षी महत्त्वाची कामगिरी

भारताने गतवर्षी ऑलिंपियाड बुद्धिबळ स्पर्धेत रशियासह संयुक्त विजेतेपद मिळविले. त्यावेळी भक्तीची प्रथमच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड झाली होती. भक्तीने साखळी फेरीत सर्व तिन्ही सामने जिंकले. भारताच्या ऑलिंपियाड यशाची दखल संसदेतही घेण्यात आली होती. नंतर आशिया नेशन्स कप स्पर्धेत भारतीय संघ विजेता ठरला. त्या यशात मोलाचा वाटा उचलताना भक्तीने ११ डावात साडेसहा गुणांची कमाई केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT