World Cup 2023 | Glenn Mcgrath Dainik Gomantak
क्रीडा

तीनवेळचा वर्ल्ड चॅम्पियन म्हणतोय, भारतातील World Cup 2023 विजयासाठी 'हे' 4 संघ दावेदार

World Cup 2023: तीन वेळा विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या दिग्गज क्रिकेटरने वर्ल्डकप 2023 विजयासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या 4 संघांची नावे सांगितली आहेत.

Pranali Kodre

Glenn McGrath picked best four teams for ICC Cricket World Cup 2023:

वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक संघाची त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. अनेक आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी या १३ व्या वनडे वर्ल्डकपबद्दल विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तसेच अनेकांनी या वर्ल्डकपसाठी प्रबळ दावेदार असलेल्या संघांबद्दलही अंदाज वर्तवले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रानेही त्याचे अंदाज सांगितले आहेत. मॅकग्रा यांनी यांनी या वर्ल्डकप विजयासाठी चार प्रबळ दावेदार असलेल्या संघांची निवड केली आहे.

त्याने पाचवेळचे विजेते ऑस्ट्रेलिया, यजमान भारत, गतविजेते इंग्लंड आणि 1992 वर्ल्डकप विजेते पाकिस्तान या चार संघांची वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार म्हणून निवड केली आहे.

वर्ल्डकपमधील 4 प्रबळ दावेदार संघांबद्दल टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना मॅकग्रा म्हणाला, 'मी त्या चार संघात ऑस्ट्रेलियाची निवड केली, तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. नक्कीच भारत, ते त्यांच्या घरच्या परिस्थितीत खेळणार आहेत. इंग्लंड सध्या शानदार क्रिकेट खेळत आहे आणि पाकिस्तानही सध्या चांगले क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे ते माझ्यासाठी सर्वोत्तम चार संघ असतील.'

मॅकग्रा वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाकडून तीन वनडे वर्ल्डकप जिंकले आहेत. तसेच 1996, 1999, 2003आणि 2007 अशा सलग चार वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातही खेळला आहे. मॅकग्राने वनडे वर्ल्डकपमध्ये 39 सामन्यांमध्ये सर्वाधिक 71 विकेट्स घेतल्या आहेत.

वर्ल्डकपचा 46 दिवस रंगणार थरार

वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान एकूण 46 दिवस होणार असून या स्पर्धेत 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व 48 सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरांमध्ये होणार आहेत.

या स्पर्धेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे संघ सहभागी होणार आहेत. या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे.

त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळवणारे संघ 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात खेळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT