Glenn Maxwell 
क्रीडा

World Cup इतिहासातील वेगवान शतक ठोकण्यापूर्वी मॅक्सवेलला का नव्हती करायची बॅटिंग, स्वत:च केला खुलासा

Glenn Maxwell: वर्ल्डकपमध्ये 40 चेंडूत शतक करण्याआधी मॅक्सवेलची फलंदाजीलाच जायची इच्छा नव्हती.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, Australia vs Netherlands, Glenn Maxwell:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी (25 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सला तब्बल 309 धावांनी पराभूत केले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मिळवलेला हा विजय वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. दरम्यान, या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने शतकी खेळी करत इतिहास रचला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने 44 चेंडूत 106 धावांची खेळी केली. ही खेळी करताना त्याने 40 चेंडूत शतक केले होते. त्यामुळे तो वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा क्रिकेटपटू ठरला. त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही मिळाला.

तथापि, असे असले तरी सामन्यानंतर मॅक्सवेलने सांगितले की त्याला फलंदाजीला जाण्यापूर्वी थोडं बरं वाटत नव्हतं, त्यामुळे त्याला फलंदाजीला जाण्याचीही इच्छा नव्हती.

मॅक्सवेल म्हणाला, 'मी ड्रेसिंग रुममध्येच बसलो होतो. मला खरंच फलंदाजीला जायची इच्छा नव्हती. यापूर्वीच्या सामन्यापेक्षा हे जरा वेगळे होते, त्यावेळी मला फलंदाजीला जाण्याची मनापासून इच्छा होती. पण, असं होतं. मी जेव्हा फलंदाजीला गेलो, तेव्हा मला थोडी थंडीही जाणवत होती.'

'मला फार आशाही नव्हत्या. पण मी गेल्या दोन दिवस वैतागलो होते, त्यातच रात्री कुटुंबासमवेत रात्री जागरण करावे लागले.'

मॅक्सवेलने शतक केल्यानंतर ते शतक त्याच्या नवज्यात मुलाला समर्पित केले आहे. मॅक्सवेल आणि त्याची पत्नी विनी रमण यांना गेल्या महिन्यात पुत्ररत्न प्राप्त झाले आहे.

दरम्यान, मॅक्सवेने या सामन्यानंतर स्टेडियममध्ये ब्रेक्सदरम्यात करण्यात येणाऱ्या लाईट शो बद्दलही नाराजी व्यक्त केली. यासाठी त्याने बीबीएलमधील पर्थमध्ये झालेल्या सामन्याचेही उदाहरण दिले. त्याने म्हटले त्यावेळीही तो चकीत झाला होता. तो लाईटशो त्याच्यासाठी डोकेदुखी ठरला होता, कारण त्यामुळे क्रिकेटपटूंना पुन्हा डोळे स्थारावण्यासाठी वेळ लागतो.

दरम्यान, या सामन्यात मॅक्सवेलने त्याची खेळी करताना 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर पुढच्या 13 चेंडूत त्याने पुढच्या 50 धावा पूर्ण केल्या, असे त्याने अवघ्या 40 चेंडूत शतक पूर्ण केले होते. मॅक्सवेलचे हे शतक वनडेमधील चौथ्या क्रमांकाचेही सर्वात वेगवान शतक ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

SCROLL FOR NEXT