Glenn Maxwell Dainik Gomantak
क्रीडा

ग्लेन मॅक्सवेलला नशीबाने दिली साथ, तब्बल 5 वर्षांनी कसोटी संघात मिळाले स्थान

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मॅक्सवेलला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात एक-दोन नव्हे तर तब्बल 12 वर्षांनी स्थान मिळाले आहे. सप्टेंबर 2017 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या मॅक्सवेलचा श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघातील दुखापतग्रस्तांची यादी मोठी झाल्याने मॅक्सवेलला ही संधी मिळाली आहे.

दरम्यान, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ज्याला व्हाइट बॉल क्रिकेटचा बादशाह म्हटले जाते, त्याने ऑस्ट्रेलियन संघाकडून केवळ 7 कसोटी सामने खेळले आहेत. 2013 मध्ये त्याने रेड बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु 2017 पर्यंत तो फक्त 7 कसोटी सामन्यांमध्ये भाग घेऊ शकला. या काळात त्याने शतकही झळकावले, परंतु तो तेवढा प्रभावी ठरला नाही. यावेळीही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

तसेच, श्रीलंका (Sri Lanka) दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला सतत दुखापतींचा सामना करावा लागत आहे. स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श, ट्रॅव्हिस हेड, शॉन ऍबॉट आणि ऍश्टन आगर या खेळाडूंसह संघाचे अर्धा डझन प्रमुख खेळाडू दुखापतींनी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाने (Australia) ग्लेन मॅक्सवेलची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात निवड केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT