French Footballer Paul Pogba: फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू पॉल पोग्बाला डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर चार वर्षांच्या बंदीची शिक्षा आज सुनावण्यात आली आहे. इटलीच्या डोपिंग विरोधी एजन्सीला सप्टेंबर 2023 मध्ये डोपिंग चाचणीत पोग्बा पॉझिटिव्ह आढळला होता, त्यानंतर आता पोग्बाला या बंदीला सामोरे जावे लागेल. कारण तो स्वत:ला निर्दोष सिद्ध करु शकला नाही. फ्रेंच संघाकडून खेळण्याव्यतिरिक्त पोग्बा फुटबॉल क्लब जुव्हेंटससाठी मिडफिल्डर म्हणूनही खेळतो.
दरम्यान, 2018 मध्ये झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फुटबॉल विश्वातील बड्या खेळाडूंमध्ये पॉल पोग्बा याची गणना केली जाते. पोग्बाच्या डोपिंग चाचणीत त्याच्यामध्ये सहनशक्ती वाढवणारे हार्मोन्स जास्त असल्याचे आढळून आले. त्याची पहिली चाचणी ऑगस्ट 2023 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये दुसऱ्यांदा सॅम्पल घेण्यात आले आणि त्यामध्येही तो पॉझिटिव्ह आढळला. पोग्बावर ही बंदी तेव्हापासून लागू होणार आहे जेव्हा तो पहिल्यांदा पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूवर ऑगस्ट 2027 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पोग्बा सध्या 31 वर्षांचा आहे आणि बंदी संपल्यावर तो 34 वर्षांचा असेल, त्यामुळे पुन्हा फुटबॉलच्या मैदानावर परतणे त्याच्यासाठी सोपे काम होणार नाही.
पॉल पोग्बा दुखापतीमुळे 2022 मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स संघाचा भाग होऊ शकला नाही. त्याचवेळी, 2023 मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो फार कमी सामन्यांमध्ये खेळताना दिसला. 2022 मध्ये पोग्बाला इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेडकडून फ्री ट्रान्सफर केल्यानंतर, तो इटालियन क्लब जुव्हेंटसचा भाग बनला. पोग्बाने आतापर्यंत 91 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळले असून मिडफिल्डर असूनही त्याच्या नावावर 11 गोल आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.