Cricket | Bat-Ball 
क्रीडा

Rohit Sharma: राजस्थानचा माजी क्रिकेटर रोहित शर्माचे 40 व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्व हळहळले

Former Rajasthan Cricketer Rohit Sharma Died: राजस्थानचा माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाल्याने क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.

Pranali Kodre

Former Rajasthan Cricketer Rohit Sharma passed away at the age of 40

राजस्थान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू रोहित शर्मा याचे शनिवारी (2 मार्च) निधन झाले आहे. त्यामुळे सध्या भारतीय क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

राजस्थानकडून सलामीला फलंदाजी करणारा रोहित गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यातच त्याने सिटी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला गेल्या काही दिवसांपासून यकृतासंबंधीत समस्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण त्याची झुंज अपयशी ठरली.

रोहितने 2004 मध्ये राजस्थानकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जात होता. त्याने 7 प्रथम श्रेणी सामने खेळले.

तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 28 सामने खेळले आणि 4 टी20 सामने खेळले. दरम्यान, त्याला त्याची छाप पाडला आली नव्हती. त्यामुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते.

त्याने 2014 मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत राजस्थानकडून रेल्वेविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता.

त्यानंतर तो प्रशिक्षण क्षेत्रात उतरला होता. त्याची आरएस क्रिकेट अकादमीही होती, जिथे तो प्रशिक्षण देत होता.

त्याच्या निधनानंतर राजस्थान क्रिकेटमधून हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

Goa News: गोव्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम! पुण्यातील 'इन्फोसिस सेंटर'मध्ये प्रशिक्षण

Old Goa Helipad: गोव्यात हेलिपॅडवरुन केवळ 55 यशस्वी उड्डाणे! खर्च मात्र कोटीत; 'बॅट' बेटाचा पर्याय पुढे

SCROLL FOR NEXT