Deepak Hooda  Dainik Gomantak
क्रीडा

Deepak Hooda: क्रिकेटर सबा करीमने दीपक हुड्डाबाबत केले मोठे वक्तव्य...

Deepak Hooda News: आगामी T20 विश्वचषकासाठी या खेळाडूचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय युवा फलंदाज दीपक हुड्डा (Deepak Hooda) यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या युवा फलंदाजाने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खूप चांगली कामगिरी केली. आता माजी भारतीय क्रिकेटर (Cricketer) सबा करीमने दीपक हुड्डाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसाठी हा खेळाडू सर्वोत्तम पर्याय असल्याचे सबा करीमने सांगितले आहे. त्याचबरोबर दीपक हुड्डा वेगवान फलंदाजीसोबतच गोलंदाजीही करू शकतो, असे त्याने सांगितले. (Deepak Hooda News)

* टीम इंडिया खूप दिवसांपासून अशा खेळाडूच्या शोधात होती

भारताची माजी विकेट किपर साबा करीम म्हणाले की, टीम इंडिया बऱ्याच काळापासून अशा खेळाडूच्या शोधात होती, जो टॉप-6 मध्ये फलंदाजीशिवाय गरजेनुसार गोलंदाजीही करू शकेल. ते म्हणाले की दीपक हुड्डाला (Deepak Hooda) खूप कमी संधी मिळाल्या, पण त्याने त्याच्या क्षमतेने त्याला खूप प्रभावित केले आहे. विशेष म्हणजे दीपक हुडाने आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात शतक झळकावले.

माजी भारतीय खेळाडूच्या मते, दीपक हुडा हा सध्या भारतीय संघाचा (Team India) सर्वात मोठा सामना विजेता आहे. तो अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली भूमिका बजावत आहे. दीपक हुडानेही आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी केली. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. भारतीय संघ मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे, तर मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT