Venkatesh Prasad | Team India Dainik Gomantak
क्रीडा

Venkatesh Prasad: 'पैसा आणि ताकद असूनही...', टीम इंडियावर वेंकटेश प्रसादची सडकून टीका

Team India: वेंकटेश प्रसादने भारतीय क्रिकेट संघावर तिखट शब्दात टीका केली आहे.

Pranali Kodre

Venkatesh Prasad slams Team India: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशा फरकाने विजय मिळवला आहे. तसेच सध्या सुरू असलेली 3 सामन्यांची वनडे मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने भारतीय संघावर तिखट शब्दात टीका केली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने ५ विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला ६ विकेट्सने सहज पराभूत केले. या पराभवानंतर वेंकटेश प्रसादने ट्वीट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

वेंकटेश प्रसादने ट्वीट केले आहे की 'कसोटी क्रिकेट वगळता अन्य दोन प्रकारात गेल्या काही काळापासून भारतीय संघ खूपच सामान्य वाटत आहे. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका गमावल्या आहेत. गेल्या दोन टी20 वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरी. आपण इंग्लंडप्रमाणे रोमांचक संघही नाही किंवा पूर्वीच्या ऑस्ट्रेलियासारखा घातकही नाही.'

वेंकटेश प्रसादने पुढे लिहिले, 'पैसा आणि ताकद असूनही आपल्याला सामान्य छोट्या-मोठ्या गोष्टींचा आनंद साजरा करण्याची सवय लागली आहे आणि आपण चॅम्पियन संघ बनण्यापासून खूप दूर आहोत. भारतासह सर्वच संघ जिंकण्यासाठी खेळतात, पण गेल्या काही काळापासून कामगिरी खालवण्यासाठी भारतीय संघाचा दृष्टीकोन हा देखील एक घटक आहे.'

वेंकटेश प्रसाद बऱ्याचदा भारतीय संघाच्या आणि खेळाडूंबद्दल स्पष्टपणे मते व्यक्त करताना दिसतो. यापूर्वीही त्याने केएल राहुलवर कठोर शब्दात टीका केली होती. याबद्दल बरीच चर्चाही झाली होती.

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघव्यवस्थापनाने विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळले नव्हते. सातत्याने ते क्रिकेट खेळत असल्याने त्यांना विश्रांती देण्यात आल्याचे नाणेफेकीवेळी प्रभारी कर्णधार हार्दिक पंड्याने माहिती दिली होती.

या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 182 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग वेस्ट इंडिजने 36.4 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT