India vs Bangladesh Dainik Gomantak
क्रीडा

India vs Bangladesh: भारत-बांगलादेश सामना म्हटलं की राडा फिक्स! याआधी झालेत 'हे' 5 वाद

India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे, त्यातील 5 घटनांबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Controversies during India vs Bangladesh Cricket matches: शनिवारी भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला क्रिकेट संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना पार पडला. हा सामना बरोबरीत सुटल्याने मालिकाही 1-1 अशी बरोबरीत सुटली. पण तिसऱ्या सामना वादामुळेच जास्त गाजला.

या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने तिच्या विकेटनंतर स्टंपवर बॅट मारली होती, तसेच तिने पंचावरही राग व्यक्त केला होता. दरम्यान भारत आणि बांगलादेश संघातील सामन्यांमध्ये वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही भारत आणि बांगलादेश संघातील सामन्यामध्ये बाद पाहायला मिळाले आहेत. अशाच घटनांचा आढावा घेऊ.

एमर्जिंग आशिया चषक 2023

ताजे उदाहरण म्हणजे एमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत अ विरुद्ध बांगलादेश अ संघात सामना झाला होता. या सामन्यात सौम्य सरकारचा युवराज सिंग दोदियाच्या गोलंदाजीवर  निकिन जोसने शानदार झेल घेतला होता. त्यानंतर भारतीय संघ सेलिब्रेशन करत असताना सौम्य सरकार आणि हर्षित राणा यांच्यात जोरदार वाद झाला होता.

साल 2015 मधील वाद

साल 2015 मध्ये बांगलादेशने भारताला वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत केले होते. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात बांगलादेशने विजय मिळवल्यानंतर एका बांगलादेशी वृत्तपत्रात भारतीय खेळाडूंचा अपमानजनक फोटो छापण्यात आला होता. या फोटोत मुस्तफिजूर रेहमानच्या हातात कटर दाखवले होते. तसेच भारतीय खेळाडूंचे केस कापलेले दाखवले होते. त्यामुळेही बराच वाद झाला होता.

19 वर्षांखालील वर्ल्डकप 2020

19 वर्षांखालील वर्ल्डकप 2020 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि बांगलादेश संघात पार पडला होता. या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मोठआ वाद झाला होता. दोन्ही संघातील खेळाडूंनी बॅट आणि स्टंप घेऊन एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

टी20 वर्ल्डकप 2016

टी20 वर्ल्डकप 2016 स्पर्धेत भारत आणि बांगलादेश संघात साखळी सामना पार पडला होता. या सामन्यात भारताचा तात्कालिन कर्णधार एमएस धोनीने अखेरच्या चेंडूवर केलेले धावबाद अनेकांना आठवत असेल.

अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली होती. या षटकात पहिल्या चेंडूवर मुश्फिकूर रहिमने चौकार ठोकल्यानंतर पंड्यासमोर डान्स केला होता. पण त्यानंतर हार्दिकने या षटकात सलग दोन चेंडूत दोन विकेट्स घेतल्या, तसेच अखेरच्या चेंडूवर धोनीने धावबाद केले होते. त्यामुळे सामना भारताने 1 धावेने जिंकला होता.

आशिया कप 2018

साल 2018 मध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत बांगलादेशची फिरकीपटू नजमुल इस्लामने शिखर धवनला बाद केल्यानंतर नागिन डान्स केला होता. पण या सामन्यात बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच बांगलादेशवर बरीच टिकाही झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

Goa Crime: लिफ्ट देण्याचा बहाणा अन् निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार; 15 वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT