Dean Elgar PTI
क्रीडा

SA vs IND: एल्गारच्या 185 धावांमुळे नऊ वर्षात पहिल्यांदाच टीम इंडियावर ओढावली 'अशी' नामुष्की

Team India Record: डीन एल्गारने सेंच्युरियन कसोटीत 185 धावांची खेळी केल्यानंतर टीम इंडियाच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 1st Test Match at Centurion:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनला पार पडला. या सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी गुरुवारी (28 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला. या विजयात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज डीन एल्गारने महत्त्वाची भूमिका पार पाडली.

त्याने पहिल्या डावात भारताचा संघ 245 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून 185 धावांची दीडशतकी खेळी केली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 163 धावांची मोठी आघाडी या सामन्यात घेतली होती. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला होता.

दरम्यान, त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे. गेल्या नऊ वर्षात म्हणजे 2015 पासून पहिल्यांदाच भारतीय संघाविरुद्ध एका वर्षात तीन खेळाडूंनी दीडशतकी खेळी केली आहे.

साल 2023 मध्ये मार्च महिन्यात अहमदाबादला झालेल्या कसोटीत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने 180 धावांची खेळी केली होती. तसेच जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 च्या अंतिम सामन्यात ट्रेविस हेडने ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्ध 163 धावांची खेळी केली होती. याशिवाय आता एल्गारनेही 185 धावांची खेळी केली.

यापूर्वी 2014 साली तब्बल 7 वेळा भारताविरुद्ध कसोटीत 150 पेक्षा अधिक धावांची खेळी वेगवेगळ्या खेळाडूंकडून करण्यात आली होती.

भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 6 व्या स्थानी

भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ही मालिका टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे या पराभवानंतर आता भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. भारताची या स्पर्धेत 38.89 च्या विजयी टक्केवारी आहे.

वर्ष 2023 मधील कामगिरी

भारतीय संघ 2023 वर्षात 8 कसोटी सामने खेळला आहे. यातील तीन सामने भारताने जिंकले आहेत, तर तीन सामने पराभूत झाले आहेत. तसेच 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

SCROLL FOR NEXT