वास्को स्पोर्टस क्लब व स्पोर्टिंग क्लब द गोवा यांच्यात झालेल्या सामन्याचा क्षण. Dainik Gomantak
क्रीडा

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील लढत नाट्यमय...

सेझाने अगोदरच्या लढतीत साळगावकर FC ला गोलबरोबरीत रोखले असून पणजी फुटबॉलर्सला (Football) स्पोर्टिंगकडून हार पत्करावी लागली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल (Football) स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि वास्को स्पोर्टस क्लब यांच्यातील लढतीत शेवटची पाच मिनिटे कमालीची नाट्यमय ठरली. एक खेळाडू (Players) कमी होऊनही वास्कोने गतविजेत्यांना पेनल्टी गोलमुळे 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. सामना शनिवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

अकेराज मार्टिन्सने 85 व्या मिनिटास स्पोर्टिंगला आघाडी मिळवून दिली, नंतर 88 व्या मिनिटास जॉस्टन कार्दोझने पेनल्टी फटक्यावर अचूक नेम साधत वास्को क्लबला बरोबरी साधून दिली. सामना संपण्यापूर्वी करण शिरोडकरला रेड कार्ड मिळाल्यामुळे काही काळ वास्को क्लबला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. स्पोर्टिंग क्लब,(Sporting Club) तसेच वास्को क्लबचे आता प्रत्येकी दोन सामने खेळल्यानंतर समान चार गुण झाले आहेत.

सामना कमालीचा रंगतदार ठरला, तसेच प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या सततच्या टॅकल्सनी गाजला. विश्रांतीनंतर आठव्या मिनिटास गोलक्षेत्रात स्पोर्टिंगच्या रोहित तोताड याला वास्कोच्या(Vasco) खेळाडूने पाडले, स्पोर्टिंगने पेनल्टी फटक्याचा दावा केला, पण रेफरीने त्याकडे दुर्लक्ष केले. सामना गोलशून्य बरोबरीकडे झुकत असताना स्पोर्टिंगने जोरदार मुसंडी मारली. वास्कोच्या खेळाडूंचा पहारा असतानाही अकेराज मार्टिन्सने सणसणीत फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षकाचा अंदाज चुकविला. सामन्यातील दोन मिनिटे बाकी असताना स्पोर्टिंगच्या गिरीश नाईकने जॉस्टन कार्दोझला गोलक्षेत्रात पाडले.

यावेळी स्वतः जॉस्टनने पेनल्टी फटका योग्यपणे मारत वास्कोला बरोबरी साधून दिली. स्पोर्टिंगच्या रोहित तोताड याला धोकादायकरीत्या पाडल्यामुळे वास्कोच्या करण शिरोडकरला रेफरीने मैदानाबाहेर पाठविले.

सेझाचे पणजी फुटबॉलर्सला आव्हान

गोवा प्रोफेशनल लीग (Goa Professional League) फुटबॉल स्पर्धेत रविवारी सेझा फुटबॉल अकादमीचे पणजी फुटबॉलर्ससमोर आव्हान असेल. सेझाने अगोदरच्या लढतीत साळगावकर FC ला गोलबरोबरीत रोखले असून पणजी फुटबॉलर्सला स्पोर्टिंगकडून हार पत्करावी लागली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT