Fight between Female Police officer and a Fan during India vs Pakistan match 
क्रीडा

IND vs PAK सामन्यात वाद! महिला पोलीस कर्मचारी अन् प्रेक्षक यांच्यात मारामारी, व्हिडिओ व्हायरल

Video: शनिवारी अहमदाबादला झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान पोलीस कर्मचारी अन् प्रेक्षक यांच्यात वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Fight between Female Police officer and Fan during India vs Pakistan in ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. भारताने या विजयासह गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आहे.

भारतीय क्रिकेट संघासाठी जवळपास सव्वा लाख प्रेक्षक उपस्थितीत असलेल्या स्टेडियममध्ये मिळवलेला हा विजय अविस्मरणीय ठरला असला, तरी या सामन्यादरम्यान एक वाद झाल्याचे समोर आहे.

हा सामना सुरू असताना मोठ्या प्रमाणास सुरक्षा कर्मचारीही स्टेडियममध्ये तैनात होते. याचदरम्यान एका महिला पोलीस कर्मचारी आणि एका प्रेक्षकांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे दिसले. त्यांच्यातील भांडणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की महिला पोलीस कर्मचारी आणि सामना पाहायला बसलेल्या प्रेक्षक यांच्यात शाब्दिक चकमक घडली. पण त्यानंतर त्यांच्यातील भांडण मारामारीपर्यंत गेले. दरम्यान, हा वाद का झाला किंवा यात कोणाची चूक होती, याबद्दल स्पष्ट आणि अधिकृत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताचा यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला. तसेच पाकिस्तानला पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच पराभव स्विकारावा लागला.

तसेच वनडे वर्ल्डकपच्या इतिहासातील मात्र, पाकिस्तानचा हा भारताविरुद्धचा सलग आठवा पराभव होता. यापूर्वी 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 या वर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभव स्विकारावा लागला आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 42.5 षटकांमध्ये 191 धावांत सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद रिझवानने 49 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 30.2 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची खेळी केली. तसेच श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या आणि हसन अलीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT