Cristiano Ronaldo Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2026: मेस्सीची धडाक्यात सुरुवात, पण रोनाल्डोचा फ्लॉप शो! कांगोने हिरावला पोर्तुगालचा विजय; आफ्रिकन डिफेन्स यशस्वी

FIFA World Cup 2026 Portugal vs Dr Congo Draw: ग्रुप-के मधील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सामन्यात बलाढ्य पोर्तुगाल संघाला नवख्या डीआर कांगोविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

Manish Jadhav

FIFA World Cup 2026 Portugal vs Dr Congo Draw: फिफा वर्ल्ड कप 2026 चा थरार आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून सुरुवातीच्या सामन्यांमध्येच मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अर्जेंटिनाचा स्टार कर्णधार लिओनेल मेस्सीने आपल्या जादूई खेळाच्या जोरावर विश्वचषक मोहिमेची धडाक्यात सुरुवात केली असताना, त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला मात्र पहिल्याच सामन्यात मोठा धक्का बसला. ग्रुप-के मधील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सामन्यात बलाढ्य पोर्तुगाल संघाला नवख्या डीआर कांगोविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. पोर्तुगालसारख्या तगड्या संघाला रोखून कांगोने फुटबॉल जगताला थक्क केले.

ह्यूस्टन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पोर्तुगालने अपेक्षेप्रमाणे सुरुवातीपासूनच सामन्यावर आपले नियंत्रण ठेवले. सामन्याच्या अगदी सहाव्या मिनिटालाच पेड्रो नेटोच्या एका शानदार क्रॉसवर जोआओ नेवेसने उत्कृष्ट हेडर मारत चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला आणि पोर्तुगालला (Portugal) 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सुरुवातीलाच बसलेल्या या धक्क्याने खचून न जाता डीआर कांगोने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. या आफ्रिकन संघाने पोर्तुगालच्या बचावफळीवर सलग हल्ले चढवले.

पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत आर्थर मासुआकूच्या अचूक क्रॉसवर योआने विस्साने एक दमदार हेडर मारत गोल केला आणि पोर्तुगालची आघाडी मोडीत काढली. हा गोल कांगो देशासाठी अत्यंत ऐतिहासिक ठरला, कारण 1974 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक खेळल्यानंतर तब्बल 52 वर्षांनी कांगोने वर्ल्ड कपच्या इतिहासातील आपला पहिलावहिला गोल नोंदवला.

संपूर्ण सामन्यात पोर्तुगालकडे चेंडूचा ताबा सर्वाधिक काळ राहिला, परंतु कांगोच्या अभेद्य बचावामुळे त्यांना या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला जोआओ कॅन्सेलोने एका प्रेक्षणीय ओव्हरहेड किकद्वारे गोल केला होता, मात्र ऑफसाइड असल्यामुळे पंचांनी तो गोल रद्द केला. या सामन्यात 41 वर्षे आणि 132 दिवस वय असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने विश्वचषकातील 23वा सामना खेळून इटलीच्या पाओलो माल्दिनीच्या विक्रमाची बरोबरी केली आणि तो सर्वात वयस्कर आउटफिल्ड खेळाडू ठरला.

मात्र, या मोठ्या विक्रमानंतरही रोनाल्डोला संपूर्ण सामन्यात गोल करता आला नाही. सामना संपल्यानंतर 1-1 अशा बरोबरीसह विश्वचषक इतिहासातील पहिला गुण आणि पहिला गोल मिळवल्याचा आनंद डीआर कांगोच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT