Ismael Kone Canada player injured after tackle  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup News: कतारच्या खेळाडूचं 'ते' घातक टॅकल अन् कॅनडाचा स्टार फुटबॉलपटू मैदानावरच कोसळला; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Ismael Kone Leg Injury Canada Football Team: कॅनडाचा मुख्य आणि स्टार खेळाडू इस्माइल कोने याला सामन्यादरम्यान अत्यंत गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला या संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.

Manish Jadhav

Ismael Kone Leg Injury Canada Football Team: फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये कतारविरुद्ध 6-0 असा दणदणीत विजय मिळवून कॅनडाच्या संघाने इतिहास रचला खरा, परंतु या मोठ्या आनंदाला काही वेळातच गालबोट लागले. कॅनडाचा मुख्य आणि स्टार खेळाडू इस्माइल कोने याला सामन्यादरम्यान अत्यंत गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला या संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. याशिवाय, हा सामना केवळ कॅनडाच्या विजयासाठी नाही, तर सामना संपल्यानंतर दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या जोरदार वादामुळे आणि हाणामारीमुळे जागतिक पातळीवर चर्चेत आला. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

सामन्याच्या दुसऱ्या हाफची सुरुवात झाली असताना कतारचा मिडफील्डर असिम मदीबो याने कॅनडाच्या इस्माइल कोने याला रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दोघांमध्ये जोरदार टक्कर झाली आणि कोने प्रचंड वेदनेने मैदानावरच कोसळला. कतारच्या खेळाडूच्या या धोकादायक टॅकलमुळे कोनेच्या पायाची दोन हाडे तुटली. फुटबॉलच्या खेळात ही अत्यंत गंभीर दुखापत मानली जाते. मैदानावर डॉक्टरांचे पथक त्वरित पोहोचले, मात्र दुखापत फार मोठी असल्याने त्याला तातडीने स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले.

लवकरच कोनेच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार असून, त्याला दीर्घकाळ फुटबॉलपासून दूर राहावे लागणार आहे. कोने जेव्हा स्ट्रेचरवरुन बाहेर जात होता, तेव्हा स्टेडियममधील हजारो चाहत्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्याचा उत्साह वाढवला, ज्याला कोनेनेही हात उंचावून प्रतिसाद दिला. कोनेच्या जागी आलेल्या नाथन सालिबाने काही मिनिटांतच अप्रतिम गोल केला आणि कोनेची '8 नंबर'ची जर्सी हवेत फडकवून हा गोल आपल्या जखमी सहकाऱ्याला समर्पित केला.

कॅनडाने सामना 6-0 अशा फरकाने जिंकल्यानंतर मैदानावर अचानक तणाव निर्माण झाला. कॅनडाचे (Canada) मुख्य प्रशिक्षक जेसी मार्श हे विजयाचा जल्लोष केल्यानंतर कतारचे प्रशिक्षक जुलेन लोपेटेगी यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी गेले होते. मात्र, चर्चा करत असतानाच दोघांमध्ये काही कारणावरुन कडाक्याचे भांडण सुरु झाले. पाहता पाहता दोन्ही बाजूचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांसमोर आले. त्यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.

मैदानातील वातावरण अत्यंत हिंसक आणि अनियंत्रित होत असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांनी आणि फुटबॉल अधिकाऱ्यांनी त्वरित मध्यस्थी केली. त्यांनी दोन्ही संघांच्या खेळाडूंना एकमेकांपासून वेगळे केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. हाणामारीच्या या लाजिरवाण्या प्रकारामुळे फुटबॉल जगतातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT