FIFA World Cup 2022 Kick Off Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022 Kick Off: पराभव टाळण्यासाठी यजमान कतारची इक्वाडोर संघातील खेळाडूंना 60 कोटींची लाच?

आज स्पर्धेच्या पहिल्या लढतीत दोन्ही संघ भिडणार; लढतींचे टाईमटेबल, लाईव्ह प्रक्षेपणाविषयी घ्या जाणून

Akshay Nirmale

FIFA World Cup 2022 Kick Off : फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचा किक ऑफ रविवारी सायंकाळी कतारमध्ये होत आहे. स्पर्धेच्या किक ऑफ सोहळ्यानंतर पहिला सामना ग्रुप ए मधील संघांमध्ये होणार आहे. यजमान कतार आणि इक्वाडोर या संघात हा सामना खेळला जाणार आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9.30 वाजता या सामन्यास सुरवात होईल. या सामन्याबाबत मोठी उत्सुकता फुटबॉल चाहत्यांना आहे. कारण दोन दिवसांपुर्वीच स्पर्धेच्या उद्घाटनानंतर होणाऱ्या पहिल्या लढतीत यजमान कतारचा पराभव होऊ नये, म्हणून कतारने इक्वाडोरच्या खेळाडूंना तब्बल 60 कोटी रूपये लाच दिल्याचा आरोप झाला होता.

फिफा वर्ल्डकपचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येतील. तसेच जियो सिनेमावर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंगही होणार आहे. भारतात हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30, सायंकाळी 6.30, रात्री 8.30, रात्री 9.30, आणि रात्री 12.30 वाजता असणार आहेत.

स्पर्धेत 32 संघांचा सहभाग असणार आहे. 8 ग्रुप्समध्ये हे संघ विभागले गेले आहेत. एका ग्रुपमध्ये चार संघ असतील.

असे आहेत ग्रुप

ग्रुप A - कतार, इक्वाडोर, सेनेगल, नेरदलँड

ग्रुप B - इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स

ग्रुप C - अर्जेंटीना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड

ग्रुप D - फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेनमार्क, ट्युनिशिया

ग्रुप E - स्पेन, कोस्टारिका, जर्मनी, जपान

ग्रुप F - बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया

ग्रुप G - ब्राझिल, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून

ग्रुप H - पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया रिपब्लिक

असे होतील सामने

स्पर्धेतील ग्रुप लेव्हलचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत खेळले जातील. त्यानंतर राऊंड ऑफ सिक्सटीनचे सामने 3 ते 6 डिसेंबर या काळात होतील. क्वार्टर फायनल सामने 9 आणि 10 डिसेंबर रोजी खेळले जातील. त्यानंतर 13 आणि 14 डिसेंबर रोजी टॉप 4 संघात सेमी फायनलच्या मॅचेस होतील. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना 17 डिसेंबरला होईल, तर अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे.

या स्टेडियमवर खेळले जातील सामने....

एकुण 32 संघात 64 सामने 8 वेगवेगळ्या फुटबॉल स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. अल बायत, खलीफा इंटरनेशनल, अल थुमामा, अहमद बिन अली, लुसेल, स्टेडियम 974, एजुकेशन सिटी आणि अल जानौब स्टेडियम या स्टेडियमवर हे सामने होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्ध्या तासाच्या पावसानं मालपेतील रस्त्यांना ओहळाचे स्वरूप; वाहनचालकांचा खोळंबा; निचरा व्यवस्था नसल्याने समस्या

मुसळधार पावसाचा तडाखा! आके येथील गृहनिर्माण वसाहतीची संरक्षक भिंत कोसळली; परिसरात भीतीचं वातावरण

NSUI Law Students: 'कायदा'च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या! 'एनएसयूआय'ची मागणी; कुलगुरूंकडून तोडगा काढण्याचे आश्‍वासन

Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT