FIFA WC 2022
FIFA WC 2022 Twitter
क्रीडा

FIFA World Cup 2022 या दिवशी होणार सुरू, कतार संघाच्या सामन्याने होणार सुरुवात

दैनिक गोमन्तक

जगभरात फुटबॉल (Football) हा लोकप्रिय खेल आहे. अनेक देशात हा खेळ खेळला जातो. क्रिकेटच्या तुलनेतही अधिक प्रसिद्ध असणाऱ्या फुटबॉलचा विश्वचषक यंदा कतार (Qatar) येथे पार पडणार आहे. दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार विश्वचषक सुरु होण्याची तारीख बदलली असून एक दिवस आधी सामने सुरु होणार आहेत. आधी 21 नोव्हेंबर, 2022 पासून सुरु होणारी स्पर्धा आता 20 नोव्हेंबर, 2022 रोजी सुरु होणार आहे.

यंदाही पहिला सामना हा यजमान संघाचा होणार असून कतार हा संघ इक्वेडोर विरुद्ध (Qatar vs Ecuador) मैदानात उतरणार आहे. दरम्यान इंग्लंड आणि इराण यांच्यातील सामना हा 21 नोव्हेंबर रोजीच होणार असून फक्त आता हा स्पर्धेचा ओपनिंग सामना असणार नाही. दरम्यान या बदललेल्या डेटबद्दल अधिकृत माहिती फिफाने दिली नसली तरी बऱ्याच रिपोर्टमधून ही माहिती समोर आल्याने आता केवळ फॉर्मेलिटी म्हणून फिफा लवकरच याची माहिती देईल.

1930 साली सुरु झालेली ही जगातील एक सर्वात जुनी स्पर्धा फिफा (FIFA) यंदा कतारमध्ये पार पडत आहे. 20 नोव्हेंबर, 2022 पासून सुरु होणारी ही स्पर्धा जवळपास महिनाभर चालेल. तब्बल 32 देश स्पर्धेत सहभागी होतील. ग्रुप स्टेजच्या सामन्यानतर राऊंड 16 आणि मग पुढील सामने पार पडणार आहेत. 18 डिसेंबर रोजी स्पर्धेची फायनल रंगणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

India Canada Relations: जस्टिन ट्रुडोचे पुन्हा बरळले, आम्ही खलिस्तानसोबत आहोत; भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?

Loksabha Election : प्रचारासाठी पायाला भिंगरी, जनसामान्‍यांना भेटीची आस; पल्‍लवी धेंपे यांचा प्रचार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

SCROLL FOR NEXT