Sports Village Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup दरम्यान कतारमध्ये मोठी दुर्घटना, स्पोर्ट्स व्हिलेजजवळ भीषण आग

FIFA World Cup: कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून फुटबॉल विश्वचषक खेळला जात आहे. सध्या गट फेरीचे सामने सुरु आहेत.

दैनिक गोमन्तक

FIFA World Cup: कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून फुटबॉल विश्वचषक खेळला जात आहे. सध्या गट फेरीचे सामने सुरु आहेत. सामन्यापेक्षा हा विश्वचषक वेगवेगळ्या प्रकारच्या वादांमुळे चर्चेत आहे. आता आणखी एका गोष्टीने आयोजकांना त्रास दिला आहे. विश्वचषकासाठी बांधण्यात आलेल्या स्पोर्ट्स व्हिलेजजवळ (फॅन व्हिलेज) आग लागली. देशातील सर्वात मोठ्या लुसेल स्टेडियमजवळ ही घटना घडली.

दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आग लागल्यानंतर आकाशात धुराचे लोट दिसत आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीला आग लागली आहे. त्यावर नियंत्रण आणले आहे. कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

दुसरीकडे, धुराचे लोट स्पोर्ट्स व्हिलेजकडे गेल्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लोक आपापल्या जागेवरुन पळू लागले. मात्र, पोलीस दलाने त्यांना आग मोठी नसल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लुसेल शहराचा भाग असलेल्या एका बेटावर स्थानिक वेळेनुसार दुपारनंतर आग लागली. लुसेल या स्पर्धेदरम्यान अनेक सामने आयोजित करत आहे. येथेच शनिवारी रात्री उशिरा अर्जेंटिनाचा (Argentina) सामना मेक्सिकोशी होणार आहे. लुसेल स्टेडियमपासून आग सुमारे 3.5 किलोमीटर (2 मैल) होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT