FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

ओर्तिझमुळे एफसी गोवाचा धडाका, चेन्नईयीनचा पाच गोलने धुव्वा

आयएसएल स्पर्धेच्या आठव्या मोसमात हॅटट्रिकची नोंद करणारा होर्गे ओर्तिझ हा पाचवा खेळाडू ठरला

दैनिक गोमन्तक

पणजी ः एफसी गोवा संघ आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत साफ निस्तेज ठरला, मात्र बुधवारी वास्को येथील टिळक मैदानावर या संघाची पूर्वीची आक्रमकता दिसली, त्यास स्पॅनिश आघाडीपटू होर्गे ओर्तिझचा धडाका कारणीभूत ठरला. त्याच्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीचा 5-0 फरकाने धुव्वा उडविला.

ओर्तिझ याने अनुक्रमे 20, 41 व 53व्या मिनिटास गोल नोंदवून एफसी गोवातर्फे (FC Goa) मोसमातील पहिली हॅटट्रिक नोंदविली. त्याचा तिसरा गोल यावेळच्या स्पर्धेतील अडीचशेवा ठरला. त्यापूर्वी 12व्या मिनिटास माकन चोठे याने एफसी गोवाचे गोलखाते उघडले होते. 45+1 व्या मिनिटास नारायण दास याच्या स्वयंगोलमुळेही एफसी गोवाची आघाडी वाढली. सलग पाच सामने विजयाविना राहिल्यानंतर एफसी गोवाने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. त्यांचा हा स्पर्धेतील चौथा विजय ठरला. त्यामुळे 16 लढतीनंतर 18 गुण झाले. 

सी गोवाने चेन्नईयीनला 1

0 फरकाने हरविले होते. चेन्नईयीनला सातवा पराभव पत्करावा लागला. त्यांचे 16 लढतीनंतर 19 गुण कायम राहिले. आजच्या निकालानंतर गुणतक्त्यात चेन्नईयीन आठव्या, तर एफसी गोवा नवव्या क्रमांकावर कायम राहिला.

स्पॅनिश आघाडीपटू होर्गे ओर्तिझ याने चेन्नईयीन एफसीच्या बचावफळीचा फडशा पाडताना निर्विवाद वर्चस्व राखले. त्याला रोखणे चेन्नईयीनच्या बचावफळीस शक्य झाले नाही. तब्बल नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरलेला डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ एकदम ताजातवाना दिसला, त्यांच्या आक्रमकतेसमोर चेन्नईयीन संघ शेवटपर्यंत सावरूच शकला नाही. मोठ्या पराभवामुळे या संघाचे प्रशिक्षक बोझिदार बँडोविच साफ हताश झाले. हॅटट्रिक पूर्ण झाल्यानंतर 58 व्या मिनिटास ओर्तिझची जागा त्याचा देशवासीय आयराम काब्रेरा याने घेतली. ऐबान डोहलिंग याचा खेळही उल्लेखनीय ठरला. एफसी गोवाचे दोन गोल त्याच्या असिस्टवर झाले. यंदा एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग याने प्रथमच सामन्यात गोल न स्वीकारण्याची किमया साधली.

यंदा पाचवी हॅटट्रिक

आयएसएल (ISL) स्पर्धेच्या आठव्या मोसमात हॅटट्रिकची नोंद करणारा होर्गे ओर्तिझ हा पाचवा खेळाडू ठरला. यापूर्वी जमशेदपूरचा ग्रेग स्टुअर्ट, नॉर्थईस्ट युनायटेडचा देशॉर्न ब्राऊन, हैदराबादचा बार्थोलोम्यू ओगबेचे व एटीके मोहन बागानचा कियान नासिरी यांनी सामन्यात तीन गोल केले होते.

- एफसी गोवाचा हुकमी खेळाडू एदू बेदिया याचे 100 आयएसएल सामने

- आठव्या आयएसएल स्पर्धेत 150 व्या गोलचा मान एफसी गोवाच्या होर्गे ओर्तिझला

- ओर्तिझचे यंदा 12 सामन्यांत 7, तर एकूण 33 आयएसएल सामन्यांत 13 गोल

- एफसी गोवाच्या माकन चोठे याचा पहिलाच आयएसएल गोल

- आयएसएलमधील चेन्नईयीनविरुद्धच्या 21 सामन्यात एफसी गोवाचे 11 विजय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT