Alberto Nogera Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवा मुसंडी मारण्याइतपत सक्षम : नोगेरा

आपला संघ मुसंडी मारण्याइतपत निश्चितच सक्षम असल्याचे त्यांनी (Alberto Nogera) मंगळवारी सांगितले.

दैनिक गोमन्तक

पणजी : इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा (FC Goa) संघाला पहिल्याच लढतीत नामुष्कीजनक हार पत्करावी लागली, मात्र त्यांचा स्पॅनिश आल्बर्टो नोगेरा (Alberto Nogera) आशावादी आहे. आपला संघ मुसंडी मारण्याइतपत निश्चितच सक्षम असल्याचे त्यांनी मंगळवारी सांगितले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सोमवारी झालेल्या लढतीत एफसी गोवास गतविजेत्या मुंबई सिटी एफसीकडून तीन गोलने हार पत्करावी लागली. गतमोसमात एफसी गोवाचा स्टार स्ट्रायकर राहिलेल्या इगोर आंगुलो याने दोन, तर ब्राझीलियन य्गोर कातातौ याने एक गोल केला. कालच्या लढतीत हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघ साफ निष्प्रभ ठरला. त्यामुळे आयएसएल स्पर्धेतील त्यांची 15 अपराजित सामन्यांची मालिका खंडित झाली. एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना शुक्रवारी बांबोळी येथील स्टेडियमवर जमशेदपूर एफसीविरुद्ध होईल.

आल्बर्टो नोगेरा 32 वर्षांचा असून या स्पॅनिश मध्यरक्षकाचा एफसी गोवातर्फे यंदा दुसरा आयएसएल मोसम आहे. गतमोसमात तो आयएसएल स्पर्धेतील सर्वोत्तम पास पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्याने आठ असिस्ट व एका गोलची नोंद केली होती.

``संघातील नवोदितांना मदत करताना स्थिती बदलण्याबाबत जबाबदारी घेण्याची माझी तयारी आहे. मी संघातील सीनियर खेळाडू आहे या नात्याने नव्हे, तर कालचा दिवस खराब होता हे सिद्ध करण्याची क्षमता आमच्यात आहे या कारणास्तव मी भार उचलू इच्छितो,`` असे नोगेरा याने नमूद केले. ``प्रगती साधण्याची आमची इच्छा आहे. माझा संघावर भरवसा आहे. आम्ही काही बाबींत बदल घडवू शकतो, पुन्हा एकदा चांगला मोसम अनुभवू शकतो याची खात्री आहे. माझा शंभर टक्के या संघावर विश्वास आहे,`` असे स्पॅनिश मध्यरक्षक म्हणाला.

`पुढील सामना लगेच हे चांगले`

एफसी गोवाचा पुढील सामना लगेच ही चांगली बाब आहे, असे नोगेरा याला वाटते. संघाच्या सरावात आगामी सामन्यासाठी तयारी केली जाईल. भूतकाळाविषयी आम्हाला जास्त विचार करायचा नाही. नवा सामना आम्हाला संधी देणारा ठरेल, असे सांगत नोगेरा याने एफसी गोवाने मुंबई सिटीविरुद्ध निराशाजनक खेळ केल्याचे मान्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT