पश्चिम बंगालमधील कल्याणी स्टेडियमचे संग्रहित छायाचित्र (FC Goa) Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa समोर मैदानाचे आव्हान

Delhi FC विरुद्ध आज ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व लढत

Dainik Gomantak

पणजी: एफसी गोवाने (FC Goa) 130व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेत (130th Durand Cup Football Tournament) नवोदित खेळाडूंवर जास्त विश्वास दाखवत सलग तीन विजयांसह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, आता त्यांची नजर उपांत्य फेरीतील जागेवर असून त्यासाठी त्यांना शुक्रवारी (ता. 24) दिल्ली एफसी (Delhi FC) संघाची झुंज परतावून लावणे आवश्यक असेल.

उपांत्यपूर्व सामना सामना कल्याणी म्युनिसिपल स्टेडियमवर (Kalyani Municipal Stadium) होईल. यावेळी कोलकात्यातील पावसामुळे प्रतिकुल परिणाम झालेल्या मैदानावर खेळण्याचे आव्हानही आयएसएल (ISL) संघाला पेलावे लागेल. एकंदरीत एफसी गोवा संघाच्या तंबूत चिंतेचे वातावरण आहे.

मैदानाच्या स्थितीविषयी एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी सांगितले, की आयोजकांनी जरी सामना कल्याणी स्टेडियमवर नेण्याचे ठरविले असले, तरी अनिश्चितता बरीच आहे. या मैदानावर खेळलेल्या केरळा ब्लास्टर्स संघाच्या प्रशिक्षकांनी (इव्हान व्हुकोमोनोविच) व्यक्त केलेली शंका पाहता मैदानाविषयी विश्वास वाटणे कठीण वाटते. कल्याणी येथील मैदान आमच्या निवासापासून अडीच तासाच्या अंतरावर आहे. सामना दुपारी दोन वाजता असल्याने आम्हाला सकाळी सहा वाजता कूच करणे आवश्यक असेल. हे खेळाडू, तसेच कोणत्याही व्यावसायिक फुटबॉल संघासाठी आदर्शवत नाही. त्यामुळे आयोजकांना अतिशय महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल.

सामन्याचे कल्याणी येथे स्थलांतर

कोलकात्यातील जोरदार पावसामुळे ड्युरँड कप स्पर्धा आयोजन समितीला एफसी गोवा आणि दिल्ली एफसी यांच्यातील उपांत्यपूर्व सामना दुसऱ्या मैदानावर हलवावा लागला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, शुक्रवारी लढत कोलकात्यातील मोहन बागान स्टेडियमवर होणार होती, उद्या हीच लढत आता कल्याणी म्युनिसिपल स्टेडियमवर खेळली जाईल. सामन्यास दुपारी दोन वाजता सुरवात होईल. मोहन बागान मैदान पावसामुळे फुटबॉल खेळण्यास अयोग्य ठरले आहे, असे स्पर्धा आयोजन समितीने स्पष्ट केले आहे.

आर्मी रेड संघात ‘कोरोना’

आर्मी रेड संघात कोरोना विषाणू बाधित आढळल्यामुळे या संघाने ड्युरँड कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीतून गुरुवारी माघार घेतली, त्यामुळे सामना न खेळताच एफसी बंगळूर युनायटेडला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. आरोग्य सुरक्षिततेच्या कारणास्तव आर्मी रेड संघाने हा निर्णय घेतल्याचे स्थानिक आयोजन समितीने नमूद केले. गुरुवारी झालेल्या कोलकात्यातील विवेकानंद युबा भारती क्रीडांगणावर महम्मेडन स्पोर्टिंग क्लबने गतविजेत्या गोकुळम केरळा संघावर एका गोलने मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. निर्णायक गोल विश्रांतीला एक मिनिट असताना मार्कुस जोसेफ याने नोंदविला. उपांत्य लढत मोहम्मेडन स्पोर्टिंग व बंगळूर युनायटेड यांच्यात होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT