Marc Valiente
Marc Valiente Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa: मार्क व्हालेंते करारबद्ध, एफसी गोवाचा परदेशी खेळाडू कोटा पूर्ण

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवा (FC Goa) संघाने २०२२-२३ फुटबॉल मोसमासाठी परदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण केला. स्पॅनिश बचावपटू मार्क व्हालेंते (defender Marc Valiente) संघातील सहावा विदेशी खेळाडू ठरला असून त्याच्या २०२३ मधील मोसमअखेरपर्यंत करार करण्यात आला.

वालेंते ३५ वर्षांचा असून स्पेनसह बेल्जियम, इस्त्राईल व सर्बियात व्यावसायिक फुटबॉल खेळण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. ज्युनियर पातळीवर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळला आहे. २००६ साली १९ वर्षांखालील युरो करंडक स्पर्धेत त्याने स्पेनचे प्रतिनिधित्व केले होते.

‘‘कारकिर्दीतील नवा अध्याय सुरू करण्यासाठी मी उत्सुक आहे. नवा अनुभव घेण्यासाठी माझ्यासाठी ही संधी आहे,’’ असे व्हालेंते याने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. ‘‘हा निर्णय घेण्यामागे प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी मोठा प्रभाव पाडला. संघ आणि मुख्य प्रशिक्षक या नात्याने आपले नियोजन त्यांनी सविस्तरपणे मांडले. शिवाय संघातील अन्य खेळाडू अल्वारो वाझकेझ याच्याशीही चर्चाच केली. वाझकेझ आणि मी यापूर्वी एकत्रित खेळलो आहोत. त्याच्यासारखा सहकारी असल्यामुळे मी निर्धास्तपणे करार केला,’’ असेही व्हालेंते याने नमूद केले.

‘‘एफसी गोवा संघ अव्वल स्थानाची लक्ष्यप्राप्ती करण्याच्या लायकीचा आहे. मी या संघाच्या शैलीच्या प्रेमात पडलोय. त्यांच्यासारखे आक्रमक फुटबॉल खेळताना बचावपटू प्रत्येकवेळी एकाग्रतेवर भर द्यावा लागतो, प्रतिहल्ल्यास सज्ज राहावे लागते. मला या शैलीत खेळण्यास आवडेल,’’ असे व्हालेंते एफसी गोवाच्या शैलीविषयी म्हणाला.

मार्क हा उच्च दर्जाचा खेळाडू असून कारकिर्दीत तो अतिशय उच्च पातळीवर व्यावसायिक फुटबॉल खेळला आहे. आमच्या शैलीसाठी तो आदर्शवत आहे. चेंडूवर नियंत्रण राखण्याचे आणि बचावफळीतून मुसंडी मारण्यात तो वाकबगार आहे. सेंटर बॅक खेळाडूसाठी ही मुलभूत आवश्यकता आहे, असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी नव्या खेळाडूचे स्वागत करताना सांगितले. बचावफळीत तो उत्कृष्ट नेता असल्याचेही पुस्कुर यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT