ISL Football  Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football : ‘एफसी गोवा’ची नवोदितांना संधी

एकूण 27 सदस्यीय संघात 10 गोमंतकीय

दैनिक गोमन्तक

पणजी : एफसी गोवा संघाने आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी 27 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात डेव्हलपमेंट चमूतील नवोदितांनाही स्थान देण्यात आले आहे. संघ एकूण दहा गोमंतकीय फुटबॉलपटू आहेत.

(FC Goa announced team for the upcoming Indian Super League football tournament)

यावेळच्या आयएसएल स्पर्धेला येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे. एफसी गोवाचा पहिला सामना 12 ऑक्टोबरला ईस्ट बंगालविरुद्ध कोलकाता येथे खेळला जाईल. त्यांचा पहिला होम सामना 3 नोव्हेंबरला जमशेदपूर एफसीविरुद्ध फातोर्डा येथे होईल. एफसी गोवातर्फे खेळलेले कार्लोस पेनया आता मुख्य प्रशिक्षक या नात्याने आयएसएल स्पर्धेत पदार्पण करतील. खेळाडू या नात्याने एफसी गोवातर्फे ते 2019 मध्ये सुपर कप, तर 2020 मध्ये आयएसएल लीग विनर्स लीग विजेते ठरले होते.

डेव्हलपमेंट संघातील सहा जण

एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघ प्रक्रियेत तयार झालेले सहा खेळाडू यंदा सीनियर संघात असतील. ह्रतिक तिवारी, लिअँडर डिकुन्हा, सावियर गामा, प्रिन्सटन रिबेलो यापूर्वी खेळले आहेत, तर लेस्ली रिबेलो व एचपी लालरेमरुआता यांना सीनियर संघात बढती मिळाली आहे.

संघात सहा परदेशी खेळाडू

आयएसएल स्पर्धा नियमानुसार एफसी गोवा संघात सहा परदेशी करारबद्ध खेळाडू आहेत, त्यापैकी एक आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) संलग्न आहे. संघात चार 23 वर्षांखालील खेळाडू निवडणे बंधनकारक आहे, यावेळी एफसी गोवाने या वयोगटातील नऊ खेळाडूंची निवड केली आहे.

एकूण सात नवे चेहरे

एफसी गोवा संघात यंदा सात नवे चेहरे आहेत. यामध्ये गोलरक्षक अर्शदीप सिंग पूर्वी ओडिशा एफसीतर्फे, तर आघाडीफळीतील स्पॅनिश अल्वारो वाझकेझ गतमोसमात केरळा ब्लास्टर्सतर्फे खेळला होता. याशिवाय सीरियाचा फारेस अर्नोट, स्पेनचा मार्क व्हालेंते, मोरोक्कोचा नोह सादौई, स्पेनचा इकेर ग्वार्रोचेना आणि आयुष छेत्री हे एफसी गोवातर्फे आयएसएल पदार्पण करतील.

2022-23 आयएसएल मोसमासाठी संघ

गोलरक्षक : धीरज सिंग, अर्शदीप सिंग, ह्रतिक तिवारी.

बचावपटू : सॅनसन परेरा, अन्वर अली, फारेस अर्नोट (सीरिया), लिअँंडर डिकुन्हा, मार्क व्हालेंते (स्पेन), सेरिटन फर्नांडिस, सावियर गामा, ऐबान्भा डोहलिंग, लेस्ली रिबेलो.

मध्यरक्षक : ब्रँडन फर्नांडिस (कर्णधार), प्रिन्सटन रिबेलो, आयुष छेत्री, फ्रांग्की बुआम, माकन चोठे, रेडीम ट्लांग, एदू बेदिया (स्पेन), ग्लॅन मार्टिन्स, ब्रायसन फर्नांडिस, मुहम्मद नेमिल, एचपी लालरेमरुआता.

आघाडीपटू : नोह सादौई (मोरोक्को), देवेंद्र मुरगावकर, इकेर ग्वार्रोचेना, अल्वारो वाझकेझ (दोघेही स्पेन).

प्रशिक्षण चमू : कार्लोस पेनया (मुख्य प्रशिक्षक), गौरमांगी सिंग (सहाय्यक प्रशिक्षक), गोर्का अझकोर्रा (सहाय्यक प्रशिक्षक), जोएल डोन्स (स्टेंग्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक), एदुआर्द कार्रेरा (गोलरक्षक प्रशिक्षक).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"'स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

Volkswagen Layoffs: ऑटोमोबाईल विश्वात मोठा भूकंप! 'फोक्सवॅगन' 50000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; पोर्शे अन् ऑडी सारख्या ब्रँड्सनाही फटका

Dhurandhar 2: रिलीजपूर्वीच ‘धुरंधर ’चा धमाका! विक्रमी ऍडव्हान्स बुकिंग; सगळे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता

VIDEO: हॉर्मुझची सामुद्रधुनी बनली 'युद्धभूमी'! इराणी नौदलाला अमेरिकेचा मोठा दणका, 16 जहाजे केली उद्ध्वस्त; थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT