Goa Pro League Kishor Petkar
क्रीडा

एफसी गोवाची स्पोर्टिंगशी बरोबरी

एफसी गोवा व स्पोर्टिंगक्लब द गोव संघाची बरोबरी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत (Goa Pro League) एफसी गोवा व स्पोर्टिंगक्लब द गोवा संघाने प्रत्येकी एक गुण विभागून घेतला. त्यांच्यात म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर गुरुवारी झालेली लढत १-१ गोलबरोबरीत राहिली.

एफसी गोवाने ३५व्या मिनिटास आघाडी घेतली. व्हेलरॉय फर्नांडिसने प्रतिस्पर्धी गोलरक्षकास चकवा देत संघाचे गोल खाते उघडले, मात्र त्याला चार मिनिटानंतर पुन्हा अचूक नेमबाजी करता आली नाही. विश्रांतीला एफसी गोवा संघ एका गोलने (Goal) आघाडीवर होता. गतविजेत्या स्पोर्टिंगने तासाभराच्या खेळात बरोबरी साधली. रोहित तोताड याने एफसी गोवाचा गोलरक्षक हॅन्सेल कुएल्हो जाग्यावर नसल्याची संधी साधली. उत्तरार्धातील खेळात बचावफळीतील दिशांक कुंकळीकर याला झालेली दुखापतही एफसी गोवाला महागात पडली.

सामन्याच्या सातव्याच मिनिटास ब्रायसन फर्नांडिसच्या असिस्टवर मेव्हन डायस याचा नेम चुकला, त्यामुळे सुरवातीलाच स्पोर्टिंगवर दबाव टाकणे एफसी गोवा (FC Goa) स शक्य झाले नाही. त्यांच्या डेल्टन कुलासो यानेही आक्रमक खेळ केला, पण सदोष नेमबाजीचा फटका बसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT