Kyle Mayers  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: लखनऊच्या 'या' खेळाडूने ठोकले तूफानी अर्धशतक, गब्बरच्या कॅम्पमध्ये दहशत!

PBKS vs LSG: मोहालीच्या पीसीए आयएस बिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून लखनऊला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

Manish Jadhav

PBKS vs LSG: आयपीएल (IPL-2023) च्या 16 व्या हंगामातील 38 वा सामना लखनऊ सुपरजायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरु आहे, जिथे एका धडाकेबाज खेळाडूने बॅटने थैमान घातले आहे.

मोहालीच्या पीसीए आयएस बिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून लखनऊला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

धवन खांद्याच्या दुखापतीतून सावरला आहे

दरम्यान, शिखर धवन (Shikhar Dhawan) अनेक सामन्यांनंतर नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला आहे. शुक्रवारी लखनऊ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

तो खांद्याच्या दुखापतीशी झुंज देत होता. याबाबत तो म्हणाला की, 'पहिल्यांदा तो गोलंदाजी करणार आहे. खांदा नेहमीपेक्षा चांगला आहे - आता वेदना होत नाही. आम्ही खूप आनंदी आहोत, 7 सामने बाकी आहेत आणि त्यापैकी बहुतांश सामने जिंकायचे आहेत.'

काइल मेयर्सची तूफानी खेळी

लखनऊ सुपरजायंट्सचे (एलएसजी) प्रतिनिधित्व करणाऱ्या विंडीजचा स्टार काइल मेयर्सने या सामन्यात चमकदार कामगिरी करत तुफानी अर्धशतक ठोकले.

तो केएल राहुलसोबत (KL Rahul) ओपनिंगला उतरला. अर्शदीप सिंगच्या डावातील दुसऱ्या षटकात त्याने 4 चौकार मारले.

त्यानंतर गुरनूर ब्रारच्या षटकात एक षटकार आणि 1 चौकार मारला. सिकंदर रझाने पहिल्या (डावाच्या 5व्या) षटकात 2 षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर 17 धावा काढल्या. डावाच्या सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारुन मेयर्सने आपले अर्धशतक पूर्ण केले.

54 धावा करुन पॅव्हेलियन परतला

मेयर्सने अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकासाठी शिखर धवनने वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाकडे चेंडू दिला.

ओव्हरच्या 5व्या चेंडूवर मेयर्सने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू मिड ऑनपर्यंतच पोहोचू शकला. तिथे उपस्थित कर्णधार धवनने कॅच पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. त्यामुळे मेयर्सचा डाव 54 धावांवर संपला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT