Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

Team India: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, 'या' मालिकेतून बुमराह करणार पुनरागमन!

Jasprit Bumrah: टीम इंडियाचा खतरनाक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच मैदानात परतणार आहे.

Manish Jadhav

Jasprit Bumrah To Return In Ireland T20 Series: भारतीय संघाला यंदा सलग दोन मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. पहिल्यांदा आशिया चषक जो 31 ऑगस्टपासून सुरु होणार आहे, तर दुसरी ICC ची सर्वात मोठी स्पर्धा एकदिवसीय विश्वचषक जो वर्षाच्या शेवटी खेळला जाईल.

मात्र, याआधीच टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. टीम इंडियाचा खतरनाक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच मैदानात परतणार आहे.

या मालिकेत पुनरागमन करणार आहे

टीम इंडियाचा (Team India) आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, जो गेल्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 पासून मैदानाबाहेर आहे, तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. विशेष म्हणजे, तो पुनरागमन करण्यासाठीही सज्ज आहे.

ऑगस्टमध्ये होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत तो पुनरागमन करताना दिसेल. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. या वर्षी मार्चमध्ये बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये रिहॅबिलिटेशन देखील केले.

बोर्डाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली

रिपोर्टनुसार, बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयर्लंड मालिकेसाठी बुमराहच्या पुनरागमनाचे संकेत खूपच सकारात्मक आहेत. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, 'बुमराह यावर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या आयर्लंड मालिकेसाठी फिट दिसत आहे.

भारतीय संघासाठी ही आनंदाची बातमी आहे. जर सर्व काही ठीक झाले तर बुमराह पुन्हा मैदानात भारताचे (India) प्रतिनिधित्व करताना दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT