MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni Last Match: धोनीबाबत 2019 वर्ल्डकपचीच IPL मध्येही होणार पुनरावृत्ती? त्या घटनेने फॅन्स इमोशनल

IPL 2023 फायनल पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार असल्याने 2019 वर्ल्डकप आणि चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी चर्चेत आले आहेत.

Pranali Kodre

MS Dhoni last match: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता.

पण रविवारी अहदाबादमध्ये मुसळधार पाऊस असल्याने हा सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी हलवण्यात आला. दरम्यान, यामुळे 2019 वर्ल्डकपमधील भारत आणि न्यूझीलंड संघातील उपांत्य सामना आणि चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी चर्चेत आले आहेत.

का होतेय चर्चा?

इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या 2019 वर्ल्डकपमधील भारत आणि न्यूझीलंड संघातील उपांत्य सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता. जुलै 2019 मध्ये झालेल्या त्या सामन्यावेळीही पावसामुळे अर्धा सामना राखीव दिवशी खेळवण्यात आलेला. तसेच राखीव दिवशी निकाल लागला होता, ज्यात भारतीय संघाला केवळ 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागलेला.

दरम्यान, हा सामना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला होता. या सामन्यानंतर साधारण वर्षभराने 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

आता सध्या आयपीएल 2023 हा धोनीचा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा आहे. त्याचमुळे आयपीएल 2023 चा अंतिम सामनाही त्याचा अखेरचा सामना ठरू शकतो.

जर असे झाले, तर धोनीबाबात अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आणि अखेरच्या आयपीएल सामन्या पावसाच्या अडथळ्याचा आणि राखीव दिवसाचा अनोखा योगायोग घडून येऊ शकतो. याच योगायोगाबद्दल चाहत्यांनीही सोशल मीडियावर चर्चा सुरू केली असून धोनीच्या चाहते मात्र भावुक झाल्याचे दिसून येत आहेत.

धोनी काय म्हणालाय निवृत्तीबद्दल?

आयपीएल 2023 मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यावेळी धोनीला हर्षा भोगले यांनी अखेरच्या आयपीएल सामन्याबद्दल प्रश्न विचारला होता. ज्यावर उत्तर देताना धोनी म्हणाला होता की 'मला माहित नाही, माझ्याकडे अजून 8-9 महिने आहेत निर्णय घ्यायला. डिसेंबरच्या जवळपास एक छोटा लिलाव होईल. त्यामुळे आत्ताच डोकेदुखी कशाला करून घ्यायची.'

'माझ्याकडे अजून बराच काळ आहे विचार करायला. पण मी नेहमीच चेन्नई सुपर किंग्सबरोबर नेहमी असेल, मग ते त्यांच्यासाठी खेळत असो किंवा मी बाहेर बसलेला असो. मी घरापासून जानेवारीपासून लांब आहे. मार्चपासून सराव करत आहे. हा मोठा निर्णय आहे, पण माझ्याकडे अजून विचार करायला बराच वेळ आहे.'

धोनीची आयपीएलमधील कामगिरी

धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 249 सामने खेळले असून 39.09 सरासरीने आणि 135.96 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 178 विकेट्स (137 झेल आणि 41 यष्टीचीत) घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

Goa Bench: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT