युरो कपच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने डेन्मार्कचा 2-1 असा पराभव करत आणि नशिबाच्या जोरावर अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Euro Cup: डेन्मार्कचा पराभव करत इंग्लंडची अंतिम फेरीत धडक

इंग्लंडने 1966 मध्ये युरो कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामना घरच्या मैदानावर असल्याने इंग्लंडच युरो कपचा दावेदार मानला जात आहे.

दैनिक गोमन्तक

युरो कपच्या (Euro Cup) दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने (England) डेन्मार्कचा (Denmark) 2-1 असा पराभव करत आणि नशिबाच्या जोरावर अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. इंग्लंडने तब्बल 55 वर्षांनी युरोच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या आधी इंग्लंडने 1966 मध्ये युरो कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

या समन्यात पहिल्या हाफमध्ये डेन्मार्कच्या मिक्केल डेम्सगार्डच्या जबरदस्त फ्रि-किकवर गोलचे खाते उघडले. पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकून राहू शकला नाही. पुढच्या नऊच मिनिटांत इंग्लंचा कर्णधार केनने एक सुरेख चाल खेळत त्यात डेन्मार्कचा कर्णधार फसला आणि त्याच्या गुडघ्याला लागून चेंडू डेन्मार्कच्याच गोलपोस्ट मध्ये गेला आणि इंग्लंडने 1-1 अशी बरोबरी साधली.

सामन्यातील 90 मिनिटापर्यंत ही बरोबरी तशीच राहिली त्यानंतर अतिरक्त वेळात 103 व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी मिळाली. त्यावेळी डेन्मार्कच्या खेळाडूंनी वार ची मागणी केली परंतू ती देखील त्यांच्या विरोधात गेली. केनने या संधीचा फयदा घेतला, पण यात देखील डेन्मार्कचा गोलरक्षक कॅम्पर याने केनने मारलेली पेनल्टी किक आडविली, पण त्याला चेंडूवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे चेंडू त्याच्या हाताला लागून पुन्हा केनच्या पायासमोर आला आणि त्या चेंडूला केनने दिशा देत गोल केला आणि इंग्लंडचा विजय निश्चित झाला.

...आता अॅडव्हान्टेज इंग्लंड

युरो कपचा अंतिम सामना इंग्लंड विरुध्द इटली यांच्यात रविवारी रंगणार आहे. हा सामना लंडनमधील वेम्बले येथेच होणार असल्याने घरच्या मैदानावर इंग्लंडला फेव्हरेट समजले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT