बुद्धिबळ संघटनेस दणका Dainik Gomantak
क्रीडा

नैतिकता आयोगाचा बुद्धिबळ संघटनेस दणका

पुढील निर्णयापर्यंत बुद्धिबळ कार्यकारी समिती निवडणूक निकालास स्थगिती

दैनिक गोमन्तक

पणजी: अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या (All India Chess Federation) नैतिकता आयोगाने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या (Goa Chess Association) निवडणूक (Election) प्रक्रियेस दणका दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 28 ऑगस्ट रोजी होणार असून तोपर्यंत कार्यकारी समिती निवडणूक निकाल जाहीर करण्यास आयोगाने स्थगिती दिली आहे.

गोवा बुद्धिबळ संघटना कार्यकारी समिती निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष बी. शिरोडकर यांनी 10 ऑगस्ट रोजी संघटनेची समिती बिनविरोध ठरल्याचे जाहीर केले होते. या प्रक्रियेस महेश कांदोळकर (तिसवाडी), आशेष केणी (सासष्टी तालुका), विश्वास पिळर्णकर (बार्देश तालुका) व अमोघ नमशीकर (फोंडा तालुका) यांनी आक्षेप घेत अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या नैतिकता आयोगाकडे तक्रार नोंदविली होती. ते अनुक्रमे अध्यक्ष, सचिव, खजिनदार व संयुक्त सचिव पदाचे उमेदवार आहेत.

या तक्रारीची दखल घेत महासंघाच्या नैतिकता आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास प्रतिवादी ठरविले आहे. नैतिकता आयोगाच्या निर्णयाची माहिती शुक्रवारी तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार आणि गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीत उत्तर गोवा विभागीय उपाध्यक्षपदी बिनविरोध ठरलेले अरविंद म्हामल यांनी दिली.

महासंघाच्या नैतिकता आयोगाने या प्रकरणी प्रतिवादी आणि गोवा बुद्धिबळ संघटनेस पुढील सुनावणीपर्यंत (ता. 28 ऑगस्ट) दस्तऐवज सादर करण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. गोवा बुद्धिबळ संघटनेची आमसभा 22 ऑगस्ट रोजी होणार आहे, त्यावेळी निवडणूक निकाल जाहीर करू नयेत आणि कार्यभार सोपवू नये असे नैतिकता आयोगाने आदेशात बजावले आहे.

नैतिकता आयोगाचे आदेशातील म्हणणे...

- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 5 ऑगस्ट 2021 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी अर्ज नाकारण्यात आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले, पण अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज नाकारण्याचा चुकीचा निर्णय देत प्रतिस्पर्ध्यांना बिनविरोध जाहीर केले.

- निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने तक्रार दाखल केलेल्यांचे उमेदवारी अर्ज नाकारून चूक केली आहे हे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 10ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज कोणत्याही आधारावर नाकारले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे प्रथमदर्शनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केलेला निकाल कायद्याच्या दृष्टीने चुकीचा आहे.

- 8 जानेवारी 2017 तारखेपूर्वी अथवा नंतरच्या गोवा बुद्धिबळ संघटनेच्या दुरुस्तीनुसार प्रत्येक तालुक्यातून फक्त एक प्रतिनिधी पदाधिकारी पदासाठी निवडणूक लढवू शकतो असे नमूद नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT