बुद्धिबळपटू एथन वाझ Dainik Gomantak
क्रीडा

एथनला बुद्धिबळात सांघिक सुवर्णपदक

भारत अ संघाला ऑनलाईन आशियाई शालेय स्पर्धेत विजेतेपद

किशोर पेटकर

पणजी: गोमंतकीय युवा बुद्धिबळपटू (Chess) एथन वाझ याचा समावेश असलेल्या भारत अ संघाने आशियाई शालेय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत 11 वर्षांखालील गटात सांघिक सुवर्णपदक जिंकले. फिलिपिन्स राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने आशियाई बुद्धिबळ महासंघ आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (फिडे) यांच्या मान्यतेने स्पर्धा घेतली होती. (Ethan Vaz of Goa won the team gold medal in chess)

भारत अ संघात तमिळनाडूचा जी. आकाश, केरळचा कृष्ण गौतम, आसामचा मृण्मय राजखोवा व गोव्याचा एथन वाझ यांचा समावेश होता. या संघाने भारत ब व इराण अ संघाला मागे टाकत विजेतेपद पटकाविले. यावर्षी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविल्यामुळे एथनची आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती.

सांघिक सुवर्णपदक विजेत्या एथनचे गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी अभिनंदन केले आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर एथनने भारतीय संघातर्फे सुवर्णपदक जिंकले आहे, जे गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद आहे. गोमंतकीय बुद्धिबळासाठी हा मानाचा क्षण आहे, असे काब्राल यांनी नमूद केले. गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी सांगितले, की भारतातर्फे खेळतान एथनचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय पदक आहे. 2019 साली पश्चिम आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत त्याने रॅपिड बुद्धिबळात वैयक्तिक सुवर्ण, तर ब्लिट्झ बुद्धिबळात वैयक्तिक रौप्यपदक जिंकले होते. एथन सां जुझे द आरियल येथील द किंग्ज स्कूलचा पाचव्या इयत्तेतील विद्यार्थी आहे. मडगाव येथील चेस गुरू गोवा अकादमीत त्याला प्रकाश विक्रम सिंग यांचे मार्गदर्शन लाभते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT