England Test Team PTI
क्रीडा

IND vs ENG: भारतीय फलंदाजांची हाराकिरी; हैदराबाद कसोटीत इंग्लंडचा दणदणीत विजय

India vs England: हैदराबाद कसोटीत इंग्लंडने भारतीय संघाला पराभवाचा धक्का देत मालिकेत आघाडी घेतली. इंग्लंडसाठी ऑली पोप आणि टॉम हार्टली विजयाचे हिरो ठरले.

Pranali Kodre

India vs England, 1st Test at Hyderabad:

भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाने हैदराबादला झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात यजमानांना पराभवाचा धक्का दिला. रविवारी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने भारताविरुद्ध 28 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाजडी घेतली आहे.

या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा दुसरा डाव 69.2 षटकात 202 धावांवर संपुष्टात आला. इंग्लडच्या पदार्पणवीर टॉम हार्टलीने 7 विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात भारताकडून भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हार्टलीचे फिरणारे चेंडू सुरुवातीपासूनच सतावत होते. पहिल्या डावात आक्रमक खेळणाऱ्या जयस्वालला या डावात हवा तसा सूर सापडत नव्हता.

त्यातच हार्टलीने त्याला 12 व्या षटकात 15 धावांवर बाद केले. त्याच षटकात शुभमन गिलही एकही धाव न करता बाद झाला. 18 व्या षटकात हार्टलीनेच कर्णधार रोहित शर्माला पायचीत पकडले.

एका बाजूने हार्टली फलंदाजांवर वर्चस्व गाजवत असताना दुसरीकडून अनुभवी जॅक लीच त्याला तोलामोलाची साथ देत होता. तसेच जो रुटनेही त्यांना चांगली साथ दिली.

रोहित बाद झाल्यानंतर पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेलने केएल राहुलची चांगली साथ दिली होती. परंतु, तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच १७ धावांवर विकेट गमावली. पाठोपाठ केएल राहुलला जो रुटने पायचीत केले.

रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यरने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण ते धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने स्टंपवर अचूक थ्रो केला. त्यामुळे जडेजा 2 धावांवरच धावबाद झाला. त्यानंतर लगेचच श्रेयस अय्यरही जॅक लीचच्या गोलंदाजीवर जो रुटकडे झेल देत 13 धावांवर बाद झाला.

भारताने 119 धावांवर 7 विकेट्स गमावलेल्या असताना केएस भरत आणि आर अश्विन यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु, 62 व्या षटकात भरतला 28 धावांवर हार्टलीने त्रिफळाचीत केले, तर 64 व्या षटकात आर अश्विनलाही 28 धावांवरच हार्टलीने माघारी धाडले.

त्यामुळे भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. तरी अखेरच्या विकेटसाठी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने 25 धावांची भागीदारी करत इंग्लंडला विजयासाठी काही वेळ वाट पाहायला लावली. परंतु अखेर हार्टलीनेच सिराजला 12 धावांवर बाद केले आणि इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.

इंग्लंडकडून हार्टलीने या डावात 7 विकेट्स घेतल्या, तर जॅक लीच आणि जो रुट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी इंग्लंडचा दुसरा डाव 102.1 षटकात 420 धावांवर संपुष्टात आला. पण पहिल्या डावातील 190 धावांच्या पिछाडीमुळे त्यांनी भारतासमोर 231 धावांचे आव्हान ठेवले होते.

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात ऑली पोपने 278 चेंडूत 21 चौकारांच्या मदतीने 196 धावांची खेळी केली होती. त्याच्याबरोबरच बेन डकेट (47), बेन फोक्स (34), टॉम हार्टली (34), झॅक क्रावली (31), रेहान अहमद (28) यांनी छोटेखानी पण महत्त्वाच्या खेळी केल्या.

भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलला 1 विकेट मिळाली.

तत्पुर्वी, या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 64.3 षटकात सर्वबाद 246 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने 121 षटकात सर्वबाद 436 धावा करत 190 धावांची आघाडी घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT