Afghanistan Cricket 
क्रीडा

World Cup 2023: गतविजेते इंग्लंड गाळात, अफगाणिस्तानच्या पाकिस्तानवरील वियानंतर पाँइंट्स टेबलमध्ये उलथापालथ

Pakistan vs Afghanistan: सोमवारी अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्याने वर्ल्डकपच्या पाँइंट्स टेबलमध्येही मोठा उलटफेर झाला आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023 Points Table:

सोमवारी (23 ऑक्टोबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अफगाणिस्तानने पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत केले. चेन्नईत झालेल्या या सामन्यात अफगाणिस्ताने विजय मिळवल्याने स्पर्धेच्या गुणतालिकेतही मोठा उलटफेर झाला आहे. पाकिस्तानचा हा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव होता. त्यामुळे त्यांना मोठा तोटा झाला आहे.

अफगाणिस्तानने आत्तापर्यंत पाच सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत, तर तीन सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे आता त्यांनी गुणतालिकेत 4 गुणांसह दहाव्या क्रमांकावरून थेट सहाव्या क्रमांकावर उडी मारली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या खाली असलेल्या बांगलादेश, नेदरलँड्स, श्रीलंका आणि इंग्लंड या चारही संघांचे 4 गुण आहेत. या चारही संघांचे आत्तापर्यंत प्रत्येकी चार सामने झाले असून या चारही संघांनी आत्तापर्यंत तीन पराभव स्विकारले असून एकच सामना जिंकला आहे.

मात्र नेट रेनरेटच्या फरकामुळे बांगलादेश सातव्या, नेदरलँड्स आठव्या, श्रीलंका नवव्या आणि इंग्लंड दहाव्या क्रमांकावर आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानच्या विजयाने गतविजेत्या इंग्लंडवर दहाव्या क्रमांकावर घसरण्याची नामुष्की ओढावली आहे.

तसेच अफगाणिस्ताच्या वर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान आहेत. या दोन्ही संघांचेही 4 गुण आहेत. परंतु, ऑस्ट्रेलियाने अद्याप चार सामने खेळले आहेत, त्यातील दोन जिंकलेत आणि दोन पराभूत झाले आहेत.

तसेच पाकिस्तानने मात्र पाच सामने खेळले असून त्यांना आत्तापर्यंत दोनच सामने जिंकता आले आहेत. त्याचबरोबर नेट रनरेटच्या फरकामुळे ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान प्रत्येकी ४ गुण असूनही अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.

या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर यजमान भारतीय संघ आहे. भारताने आत्तापर्यंत त्यांचे पाच पैकी पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वाधिक 10 गुण आहेत.

तसेच दुसऱ्या क्रमांकावर असेलल्या न्यूझीलंडने पाचपैकी चार सामने जिंकले असून त्यांचे 8 गुण आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेने चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले असून त्यांचे सध्या 6 गुण आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT