England Cricket ICC
क्रीडा

England Cricket: गतविजेत्या इंग्लंडसाठी दुष्काळात तेरावा! प्रमुख वेगवान गोलंदाज वर्ल्डकपमधून बाहेर

World Cup 2023: वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत आधीच आव्हान टिकवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

Pranali Kodre

England's Pacer Reece Topley ruled out of the rest of ICC ODI Cricket World Cup 2023:

भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धा आता जवळपास अर्धी संपली आहे. मात्र, अद्याप गतविजेत्या इंग्लंडला फारसा सूर गवसलेला नाही. त्यांनी 4 पैकी केवळ 1 सामनाच जिंकला असून 10 संघामध्ये ते सध्या 9 व्या क्रमांकावर आहेत. अशातच त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिस टोप्ली या संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर झाला आहे. याबद्दल इंग्लंड क्रिकेट बोर्डाने रविवारी (22 ऑक्टोबर) माहिती दिली. टोप्लीला शनिवारी (21 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुखापत झाली आहे.

या सामन्यात टोप्लीला त्याच्याच 9 व्या षटकात गोलंदाजी करत असताना दुखापत झाली. त्याची डाव्या हाताची तर्जनी फ्रॅक्चर झाली आहे. त्यामुळे आता तो लगेचच मायदेशी परतणार असून त्याच्या दुखापतीवर इंग्लंड आणि सरे मेडिकल टीम लक्ष ठेवून असेल.

शनिवारी दुखापत झाल्यानंतर लगेचच मैदानात त्याच्या दुखापतीवर उपचार करण्यात आले, पण त्याला मैदानातून बाहेर जाणे भाग पडले. तसेच नंतर त्याला इंग्लंडकडून फलंदाजीसाठीही उतरता आले नाही. या सामन्यात इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 400 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 22 षटकात 170 धावांवर सर्वबाद झाला होता.

दरम्यान, टोप्लीची इंग्लंडकडून वर्ल्डकप 2023 मध्ये चांगली कामगिरी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे दुखापत होण्याआधी त्याने दक्षिण आफ्रिकेच्या 3 विकेट्सही घेतल्या होत्या.

त्याने या स्पर्धेत 3 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरत होता. मात्र असे असतानाच आता तो संघातून बाहेर झाल्याने हा इंग्लंड संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

तथापि, अद्याप इंग्लंडने त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. पण आता जोफ्रा आर्चरला संघात घेतले जाण्याची शक्यता आहे. इंग्लंडला पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी बंगळुरूला खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गोवा विरुद्ध गोवा

OBC Reservation Goa Medical PG: ओबीसींना नवे 'वैद्यकीय दालन'! पदव्युत्तर क्लिनिकल शाखांतही आरक्षण; गोवा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Goa Water Metro Project: गोव्यात 'वॉटर मेट्रो'चे वारे! पर्यटन आणि स्थानिक वाहतुकीसाठी ठरणार गेम चेंजर; कोची मेट्रोच्या टीमचे मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन

Mandovi River New Casino: मांडवीत नवीन कॅसिनोसाठी 'नो एन्ट्री'! 6 जुलैपर्यंत जैसे थे स्थिती; परवाना हस्तांतरित करण्यापूर्वी कोर्टाची पूर्वपरवानगी अनिवार्य

Mapusa Hotel Fight: हॉटेल बिलाच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण, फास्ट फूड सेंटर बनले आखाडा; म्हापसा पोलिसांत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT