Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

Eng vs Pak: पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी धावून आला इंग्लंडचा कर्णधार! जाणून घ्या

Eng vs Pak Test Series: कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ 17 वर्षांनंतर पाकिस्तानात पोहोचला असून यावेळी पाकिस्तानला भीषण पुराचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक

Eng vs Pak Test Series: कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ 17 वर्षांनंतर पाकिस्तानात पोहोचला असून यावेळी पाकिस्तानला भीषण पुराचा सामना करावा लागत आहे. लाखो लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बेघर लोकांसमोर पोट भरण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मोठे मन दाखवत आपली मॅच फी पाकिस्तानातील पूरग्रस्तांना देण्याची घोषणा केली आहे. स्टोक्सने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

दरम्यान, कसोटी मालिकेपूर्वी त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'या ऐतिहासिक कसोटी मालिकेसाठी आम्ही उत्सुक आहोत. 17 वर्षांनंतर इथे कसोटी खेळणे खूप रोमांचक असेल. 2022 च्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये (Pakistan) भीषण पूर आला होता, जो पाहून खूप वाईट वाटले.'

2005 नंतर इंग्लंडचा संघ प्रथमच कसोटी खेळण्यासाठी आला होता

पावसाळ्यात पाकिस्तानमध्ये सर्वात भीषण पूर आला होता, ज्यामध्ये लाखो लोक बेघर झाले. या पुरात सार्वजनिक सुविधा, घरे आणि शाळांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. देशातील चार राज्यांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला असून त्यामुळे मोठे नुकसान झाले.

तसेच, पाकिस्तान आणि इंग्लंड (England) यांच्यात होणारी ही तीन सामन्यांची कसोटी चॅम्पियनशिप पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. त्यांचे सामने रावळपिंडी, मुलतान आणि कराची येथे होणार आहेत. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ पाकिस्तानात पोहोचला आहे. 2005 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ इथे कसोटी खेळताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

SCROLL FOR NEXT