इशांत शर्मा (Ishant Sharma) चौथ्या कसोटीतून बाहेर पडू शकतो, आणि त्याच्या जागी आर अश्विनला (R. Ashwin) संधी मिळू शकते. Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: चौथ्या कसोटीत इशांतच्या जागी मिळू शकते अश्विनला संधी

भारत (India) या दोन फिरकीपटूंसोबत जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पण अश्विनने काउंटी सामन्यात याच मैदानावर चांगली कामगिरी केली आहे.

दैनिक गोमन्तक

ENG vs IND: इशांत शर्मा (Ishant Sharma) चौथ्या कसोटीतून बाहेर पडू शकतो, आणि त्याच्या जागी आर अश्विनला (R. Ashwin) संधी मिळू शकते. तिसऱ्या कसोटीतील खराब कामगिरीमुळे भारताचा (India) वरिष्ठ वेगवान गोलंदाज इशांत शर्माला इंग्लंडविरुद्धच्या (England) उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing XI) जागा मिळणे कठीण दिसत आहे.

इंग्लंडने तिसरा सामना एक डाव आणि 76 धावांनी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. इशांतने या सामन्यात 22 षटकांत 92 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. इशांत पूर्वी घोट्याच्या दुखापतीमुळे आणि स्नायूंच्या ताणाने त्रस्त होता. तिसऱ्या कसोटी दरम्यान तो पूर्णपणे तंदुरुस्त होता की नाही याबाबच माहिती मिळाली नाही.

कर्णधार विराट कोहलीने इशांतच्या कामगिरीवर भाष्य करण्यास नकार दिला पण वेगवान गोलंदाजांच्या कामाचा ताण लक्षात घेऊन बदल केले जातील असे सूचित केले आहे. दरम्यान, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या गुडघ्याच्या स्कॅनवरून दिसून आले की त्याला गंभीर दुखापत झाली नाही पण ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन 2 सप्टेंबरपासून द ओव्हल येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

भारत या दोन फिरकीपटूंसोबत जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पण अश्विनने काउंटी सामन्यात याच मैदानावर चांगली कामगिरी केली आहे. जर इशांत वगळला गेला तर उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT