ENG vs IND 1st ODI Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND 1st ODI: 'रो-को' जोडी पुन्हा मैदानात! इंग्लंडला धडा शिकवण्यासाठी टीम इंडिया सज्ज, पहिल्या वनडेसाठी 'अशी' असेल Playing XI

ENG vs IND: भारतीय संघाच्या फलंदाजीची सुरुवात रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या जोडीकडून होण्याची शक्यता आहे.

Sameer Amunekar

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत असून पहिला सामना एजबेस्टन मैदानावर रंगणार आहे. या सामन्याचे विशेष आकर्षण म्हणजे अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची भारतीय संघात पुनरागमन. त्यामुळे टीम इंडियाच्या अंतिम प्लेइंग इलेव्हनबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सलामीला रोहित-गिलची जोडी?

भारतीय संघाच्या फलंदाजीची सुरुवात रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या जोडीकडून होण्याची शक्यता आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो, तर त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल मधल्या फळीत संघाची धुरा सांभाळतील. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल राखण्याचा प्रयत्न संघ व्यवस्थापनाकडून केला जाऊ शकतो.

शिवम दुबेला संधी, ईशान किशनला बाहेर

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी उपलब्ध नसल्याने शिवम दुबे यांना अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, मागील वनडे मालिकेत शतक झळकावूनही ईशान किशनला या सामन्यात स्थान मिळणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे संघ निवडीत स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते.

गोलंदाजीत समतोल

गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली अर्शदीप सिंह आणि गुरनूर बरार या वेगवान गोलंदाजांवर जबाबदारी असू शकते. फिरकीची धुरा कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. अक्षर पटेल खालच्या फळीत उपयुक्त फलंदाजीही करू शकतात, त्यामुळे संघाला अतिरिक्त संतुलन मिळू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग XI

  • शुभमन गिल (कर्णधार)

  • रोहित शर्मा

  • विराट कोहली

  • श्रेयस अय्यर

  • केएल राहुल

  • शिवम दुबे

  • अक्षर पटेल

  • जसप्रीत बुमराह

  • कुलदीप यादव

  • अर्शदीप सिंह

  • गुरनूर बरार

सामना किती वाजता सुरू होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना आज स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरू होईल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होणार असून, क्रिकेटप्रेमींना तो सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्स आणि JioHotstar वर थेट पाहता येणार आहे. भारताच्या अनुभवी खेळाडूंच्या पुनरागमनामुळे या सामन्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT