Electricity and water supply crisis in Kerala's greenfield stadium Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA T20 |केरळच्या ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये बिजली गुल, पाणीपुरवठ्याचेही संकट कसा होणार T20 सामना?

आतापर्यंत, केरळमधील ग्रीनफील्ड स्टेडियममध्ये चार T20 आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले आहेत ज्यात भारताचा 3-1 विजयाचा विक्रम आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघाने यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिकाही खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना तिरुअनंतपुरमच्या भव्य ग्रीनफिल्ड स्टेडियमवर होणार आहे.

(Electricity and water supply crisis in Kerala's greenfield stadium)

सामन्यापूर्वी केरळ राज्य विद्युत मंडळ (केएसईबी) थकित वीज बिलामुळे चिंतेत आहे. भव्य ग्रीनफील्ड स्टेडियम भारताविरुद्धच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यासाठी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे यजमानपदासाठी सज्ज आहे, परंतु केरळ राज्य विद्युत मंडळाने (KSEB) बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित केला आहे.

वेळापत्रकानुसार, तीन सामन्यांच्या मालिकेतील स्पर्धेचा पहिला सामना 28 सप्टेंबरपासून येथे सुरू होत आहे. केएसईबीची 2.50 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने केरळ जल प्राधिकरणही पाणीपुरवठा बंद करण्याची धमकी देत ​​आहे. तसं पाहिलं तर, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्टेडियम मालकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

केरळ क्रिकेट असोसिएशन (KCA), या मेगा इव्हेंटचे आयोजन करत आहे, जिथे सुमारे 50,000 प्रेक्षकांची विक्रमी गर्दी अपेक्षित आहे. मात्र सामन्यापूर्वी केसीएने या समस्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. स्टेडियमची वीज बिघाड झाल्यानंतर त्याचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. केसीएला आशा आहे की सर्व गोष्टी मार्गी लागतील आणि लवकरच वीज पूर्ववत होईल. कारण, केसीएला राज्य सरकारच्या हस्तक्षेपाची अपेक्षा आहे.

आत्तापर्यंत, ग्रीनफिल्ड स्टेडियमने चार T20 आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले आहेत ज्यात भारताचा 3-1 विजयाचा विक्रम आहे. येथील वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात घरच्या संघाला पराभव पत्करावा लागला होता. स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर ते 2015 च्या राष्ट्रीय खेळांसाठी स्थापन करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT